राजर्षी शाहू महाराजांसाठी कऱ्हाडचा शाहू चौक झाला स्तब्ध...

राजर्षी शाहू महाराजांप्रति Rajarshi Shahu Maharaj कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शासनाने Government आज शुक्रवारी सकाळी दहा वाजता १०० सेकंद स्तब्धता 100 seconds of silence पाळण्याचे आवाहन केले होते.
Karad Shahu chowk
Karad Shahu chowk Sarkarnama

कऱ्हाड ः पुरोगामी महाराष्ट्राचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यासाठी आज, शुक्रवारी सकाळी ठिक दहा वाजता येथील शाहू चौक परिसर १०० सेकंद स्तब्ध झाला. सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, नागरिकांनी स्तब्धता पाळत शाहू महाराजांना आदरांजली वाहली.

कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती, समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज यांची आज १०० वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने महाविकास आघाडी सरकारच्यावतीने हे वर्ष ‘कृतज्ञतापर्व’ म्हणून साजरे करण्यात येणार आहे. राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दी पर्व संपूर्ण राज्यात साजरे करणार येणार आहे. राजर्षी शाहू महाराजांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शासनाने आज शुक्रवारी सकाळी दहा वाजता १०० सेकंद स्तब्धता पाळण्याचे आवाहन केले होते.

Karad Shahu chowk
राजर्षी शाहू महाराजांची आज १०० वी पुण्यतिथी. यानिमित्ताने त्यांच्याविषयी जाणून घेऊया

त्यानुसार आज सकाळी येथील शाहू चौकातील पुतळ्यास सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पुष्पहार अर्पन करुन अभिवादन केले. त्यानंतर प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार विजय पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती मानसिंराव जगदाळे, कऱ्हाड पंचायत समितीचे माजी सभापती प्रणव ताटे, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे अध्यक्ष बबनराव भोजगांवकर, आदींसह पदाधिकारी, अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com