'संतांच्या पावलावर पाऊल ठेवत राज्यातील महाविकास आघाडीचे काम सुरू'

महाराष्ट्रातील शासकीय धोरणांवर भाजपचे ( BJP ) नेते महाविकास आघाडीला ( Mahavikas Aghadi ) लक्ष्य करत आहेत.
'संतांच्या पावलावर पाऊल ठेवत राज्यातील महाविकास आघाडीचे काम सुरू'
उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार नीलेश लंकेसरकारनामा

राळेगणसिद्धी ( अहमदनगर ) : महाराष्ट्रातील शासकीय धोरणांवर भाजपचे नेते महाविकास आघाडीला लक्ष्य करत आहेत. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारचे काम संतांनी सांगितलेल्या मार्गानुसार चालले असल्याचे म्हटले आहे. 'Following in the footsteps of saints, the work of Mahavikas Aghadi in the state begins'

पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथे संत निळोबाराय यांच्या अभंगगाथा व त्यांच्या राहत्या वाड्याचा जीर्णोद्धार कामाचा प्रारंभ प्रसंगी अजित पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार निलेश लंके, माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, पंचायत समितीच्या उपसभापती सुनंदा धुरपते, निळोबाराय देवस्थान समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव माऊली पठारे, कार्याध्यक्ष अशोक सावंत, निळोबारायांचे वंशज गोपाळकाका मकाशीर, सरपंच सुभाष गाजरे यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख देवस्थानचे सर्व पदाधिकारी व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार नीलेश लंके
अजित पवार म्हणाले, सरकार नोटा छापायची मशिन नाही...

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, महाराष्ट्र राज्याला मोठा आध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्र घडविण्याचे कामही संतांनीच केले आहे. त्याच भक्तिमार्गाने राज्यात महाविकासआघाडीचे काम सध्या सुरू आहे.

पवार पुढे म्हणाले की राज्यावर कोरोनाचे मोठे संकट असतानाही यावर राज्य सरकारने मार्ग काढत पालखी सोहळ्याची परंपरा खंडित होऊ दिली नाही. या कामी वारकरी संप्रदायानेसुद्धा सहकार्याची भूमिका घेतल्याने त्यांना धन्यवाद दिले. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गाचे काम केंद्र सरकारने घेतले असून यात राज्य सरकारने आपला वाटा उचलला आहे. या मार्गावर वृक्षारोपण करणे, मुक्कामाच्या ठिकाणी सोईसुविधा निर्माण करणे यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार नीलेश लंके
नगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करणार : अजित पवार

ते पुढे म्हणाले की, कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी कोरोना अजून गेलेला नाही. रशिया, चीन, युरोप या देशात पुन्हा तिसरी लाट आल्याचे सांगत कोरोनाविषयी हलगर्जीपणा न करता त्याबाबत काळजी घेण्याची तसेच दोन्ही लसीकरण करून घेण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले. कोरोनामुळे राज्य सरकारच्या अर्थकारणावर मोठा परिणाम झाला आहे. पर्यायाने त्याचा राज्यातील विविध विकास कामांवर परिणाम झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, चैतन्य महाराज देगलूरकर, महंत भास्करगिरी महाराज आदींची मनोगते झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवस्थान समितीचे कार्याध्यक्ष अशोक सावंत यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाराम पवार व सुभाष पठारे यांनी केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार नीलेश लंके
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा आत्महत्येचा इशारा..आमदार लंकेंकडे बोट

पारनेर शहराला पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेचे सर्वेक्षण झाले असून त्यासाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणी आमदार नीलेश लंके यांनी केली होती. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना करीत पाणी योजनेसाठी आर्थिक निधीची तरतूद करण्याचे आश्वासन यावेळेस दिले. तसेच पिंपळनेर येथील संत निळोबारायांच्या राहत्या वाड्याच्या जीर्णोद्धार कामी व सभामंडपासाठी राज्य सरकारतर्फे 50 लाखांचा निधी जाहीर केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार नीलेश लंके
'तहसीलदार देवरे यांच्या बदलीसाठीचा नवस लंकेंनी पोलिसांसह फेडला...'

आमदार लंकेंचे केले कौतुक

आमदार नीलेश लंके यांनी कोरोना काळात केलेल्या कामांमुळे पारनेर तालुक्याचे नाव जगभर पोहोचले आहे. राज्यात 288 आमदार असून त्यासर्वांमध्ये आमदार निलेश लंके यांचे काम एक नंबर आहे. त्यांचे काम चांगले असल्यामुळे त्यांना निधी द्यायला मी कुठेही कमी पडणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in