Shirval : आधी मतदान, मग लग्न.. नवरदेव मुंडवळी बांधुन आला मतदान केंद्रात...

Groom नवरदेवाने अशा पद्धतीने मतदानाचा हक्क बजावल्याची चर्चा शिरवळ परिसरात रंगली आहे.
Navardev came to vote
Navardev came to votesarkarnama

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील शिरवळ ग्रामपंचायतीत 'काटे कि टक्कर ' अशी लढती होत आहेत. मतदानादिवशी आज एका - एका मतांचा विचार होत आहे. अशा वेळी स्वतःचे लग्न असतानाही ' आधी मतदान, मग लग्न' असे ठरवुन नवरदेव प्रसाद सदाशिव निगडे यांनी चक्क मुंडवळी बांधुन येत आपला मतदानाचा हक्क बजावला. याची चर्चा आज शिरवळ परिसरात दिवसभर रंगली आहे.

शिरवळ येथे वार्ड क्रमांक दोनसाठी येथील कन्या शाळेत या नवरदेवाचे मतदान असून दुपारी तीन वाजता स्वतःचे लग्न असताना घरात लगीनघाई सुरू असतानाही वेळात वेळ काढुन आपल्याला घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार प्रथम बजावयचा, असा मनोदय नवरदेव प्रसाद निगडे यांनी केला.

त्याप्रमाणे लग्न मंडपात जाण्याआधी नवरदेवाचा पोषाख परिधान केला. मुंडवळी बांधुनच हा नवरदेव मतदानासाठी केंद्रावर हजर झाला. त्याने आपला मतदानाचा हक्क बजावला. शिरवळची निवडणुक ही राजकीयदृष्ट्या संवेदनशील असून एका - एका मतासाठी उमेदवार झगडत आहेत. अशा परस्थितीत नवरदेवाने अशा पद्धतीने मतदानाचा हक्क बजावल्याची चर्चा शिरवळ परिसरात रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com