Breaking News : मराठा महासंघाच्या माजी पदाधिकाऱ्याच्या गाडीवर गोळीबार

मोर्वे-वाघोशी Morve Waghoshi रस्त्यावरील खिंड उतरताना हा प्रकार घडला. वाहनांची वर्दळ नसणारा हा भाग नेहमी निर्मनुष्य असतो.
Prasad Konde-deshmukh
Prasad Konde-deshmukhsarkarnama

शिरवळ : मोर्वे (ता. खंडाळा) येथील दत्तमंदीराचे दर्शन घेऊन लोणंदकडे जात असताना अखिल भारतीय मराठा महासंघाचे माजी पदाधिकारी प्रसाद कोंडे-देशमुख यांच्या चारचाकी गाडीवर गोळीबार झाला. त्यास प्रतित्युतर म्हणुन कोंडे यांच्या सुरक्षारक्षकांनी ही गोळीबार केला. हा गोळीबाराचा थरार आज (मंगळवारी) दुपारी मोर्वे -वाघोशी रस्त्यावरील भादे गावच्या हद्दीत घडला. घटनास्थळी खंडाळा, शिरवळ व लोणंद पोलिसांनी भेट दिली आहे.

याबाबतची माहिती अशी की, प्रसाद कोंडे-देशमुख हे वीर (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील नाथमंदीर व मोर्वे (ता.खंडाळा) येथील दत्तमंदीराचे दर्शन घेऊन मोर्वे- वाघोशी रस्त्यावरून लोणंदकडे आपल्या चारचाकी वाहनातुन (गाडी क्रमांक एमएच12, युजी 999) निघाले होते.

यावेळी समोरुन मोटारसायकलवरून येणाऱ्या दोघांनी त्यांच्यावर कारवर गोळीबार केला. त्यास प्रतितयुत्तर म्हणुन कोंडे - देशमुख यांच्या सुरक्षारक्षकाने ही गोळीबार केला. या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, चारचाकी वाहनावर दोन गोळ्या झाडल्याचे स्पष्ट झाले. तेथे पुंगळ्या ही आढळून आल्या आहेत.

Prasad Konde-deshmukh
Maratha Reservation : आता मरण आले तरी चालेल ; मराठा महासंघ आक्रमक, आंदोलनाकडे सरकारचा कानाडोळा

या घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलिस निरिक्षक महेश इंगळे, लोणंदचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव देऊन पाहणी केली. मोर्वे-वाघोशी रस्त्यावरील खिंड उतरताना हा प्रकार घडला. वाहनांची वर्दळ नसणारा हा भाग नेहमी निर्मनुष्य असतो. या गोळीबाराच्या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. अधिकचा तपास पोलिस करीत आहेत.

Prasad Konde-deshmukh
Satara : पुणे जिल्ह्यातून येऊन सातारा जिल्ह्यात गुरगुरत्यात... शाहजीबापूंचा राष्ट्रवादीला टोला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com