अहमदनगर एमआयडीसीतील सनफार्मा कंपनीत आग

अहमदनगर ( Ahmednagar ) शहरात असलेल्या एमआयडीसीमधील सनफार्मा कंपनीतील केमिकलला आज ( बुधवारी ) रात्री 10 वाजेच्या सुमारास आग लागली.
सनफार्मा कंपनीत लागलेली आग
सनफार्मा कंपनीत लागलेली आगसरकारनामा

अहमदनगर : अहमदनगर ( Ahmednagar ) शहरात असलेल्या एमआयडीसीमधील सनफार्मा कंपनीतील केमिकलला आज ( बुधवारी ) रात्री 10 वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. Fire at Sunpharma Company in Ahmednagar MIDC

सनफार्मा कंपनीतील लोडिंग-अनलोडिंग यार्डमध्ये रात्री 10 वाजेच्या सुमारास केमिकल सॉलवंटला आग लागली. आग लागल्याचे समजताच कंपनीच्या व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी तात्काळ एमआयडीसी अग्निशमन विभाग व महापालिका अग्निशमन विभागाशी संपर्क साधला. माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन विभागाचे 2 व महापालिका अग्निशमन विभागाचे 2 असे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. राहुरी नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाचाही बंब घटनास्थळी दाखल झाला आहे, अशी माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ यांनी दिली.

सनफार्मा कंपनीत लागलेली आग
नगर अग्निकांड : चौकशीचा केवळ फार्स नको; दोषींवर कारवाई व्हावी : राधाकृष्ण विखे

आग मोठी असल्याने आग व धुराचे लोट लांब पर्यंत दिसून येत होते. आग विझविताना अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना एक मृतदेह आढळून आला आहे, अशी माहिती विश्वसनिय सूत्रांकडून समजते. सहा वर्षांपूर्वीही याच कंपनीतील केमिकलला आग लागली होती. त्यात दोन जणांचा मृत्यू झाला होता. घटनास्थळावर बघ्याची गर्दी वाढली होती. एमआयडीसीचे पोलिस पथकही घटनास्थळी दाखल झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com