नगर जिल्हा सहकारी बँकेच्या ऑडिट विभागाला आग : सगळी कागदपत्रे जळून खाक

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी लेखापरीक्षण विभागाला आग लागली.
ADCC Bank
ADCC BankSarkarnama

अहमदनगर - अहमदनगर जिल्हा सहकारी बँक ही राज्यातील अग्रगण्य सहकारी बँकांपैकी एक समजली जाते. या बँकेत आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी लेखापरीक्षण विभागाला आग लागली. या आगीत सर्व कागदपत्रे जळून गेली आहेत. ( Fire at audit department of Nagar District Co-operative Bank: Burn all documents )

जिल्हा सहकारी बँकेच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या जिल्हा उपनिबंधक कार्यालया शेजारील लेखापरीक्षण विभागाला शॉकसर्कीटमुळे आग लागली. ही घटना आज सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास घडली. सायंकाळी सहा वाजता जिल्हा सहकारी बँके, जिल्हा उपनिबंधक कार्यालय व लेखा परीक्षण विभागातील कर्मचारी कार्यालय बंद झाल्याने घरी गेले. जिल्हा सहकारी बँक व जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मोजकेच कर्मचारी होते. लेखा परीक्षण विभागातील सर्व कर्मचारी घरी निघून गेले होते. सायंकाळी पावणेसात वाजता लेखा परीक्षण विभागातून धूर येत असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्यानी पाहिले. त्यांनी तातडीने वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार जिल्हा बँकेलाही कळविण्यात आले.

ADCC Bank
अजित पवारांच्या भाषणातील प्रशांत गायकवाड व उदय शेळके कोण आहेत

घटनेची माहिती समजताच जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक शिवाजी कर्डिले जिल्हा बँकेत आले. त्यावेळी महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे वाहन आग विझविण्याचा प्रयत्न करत होती. मात्र पुरेशी साधने नसल्याने आगीवर नियंत्रण मिळविता येत नव्हते. हे पाहून शिवाजी कर्डिले यांनी जावई आमदार संग्राम जगताप यांना या बाबत माहिती दिली. आमदार जगताप यांनी एमआयडीसी अग्निशमन विभागातील बंबांना पाचारण केले. घटनेची माहिती समजताच जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे घटनास्थळी आले.

ADCC Bank
शिवाजी कर्डिले म्हणाले, राम शिंदेंना विधान परिषदेचे आमदार करा...

महापालिकेच्या अग्निशमन विभागाची अडचण

महापालिकेच्या अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी सर्व प्रथम आला मात्र आग चौथ्या मजल्याला लागली होती. तेवढी उंच शिडी व पाईप अग्निशमन विभागाकडे नाहीत. त्यामुळे पाईप आगी पर्यंत जाईना तसेच एक बंब भर पाणी फवरूनही आग अटोक्यात येईना. त्यानंतर एमआयडीसीच्या अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी आला. अद्ययावत उपकरणे असलेल्या या अग्निशमन पथकाने आगावर तातडीने नियंत्रण मिळविले. मात्र तोपर्यंत लेखा परीक्षण विभागातील कागदपत्रे जळून गेली होती. त्या कार्यालयातील फर्निचरही अर्धवट जळाले.

ADCC Bank
...म्हणून थोरातांच्या कारखान्यात विखे होते चेअरमन

सीसीटीव्हीने सांगितले आगीचे कारण

जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी बँकेत आल्यावर घटना का व कशी घडली हे पाहण्यासाठी लेखा परीक्षण कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज मागविले. या फुटेजमध्ये एका टेबल जवळील फॅनच्या विद्युतारांमध्ये शॉर्कसर्किट झाल्याचे निष्पन्न झाले.

जिल्हा सहकारी बँकेतील लेखा परीक्षण कार्यालय व जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला आग लागली होती. महापालिकेच्या अग्निशमन बंबाने पहिल्यादा प्रयत्न केला. त्यानंतर एमआयडीसीचा अग्निशमन बंब आला.

- संपत शिंदे, पोलिस निरीक्षक, कोतवाली पोलिस ठाणे, अहमदनगर.

जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्याने मला दुरध्वनीवरून घटनेची माहिती दिली. त्यानुसार मी जिल्हा सहकारी बँकेत आलो. त्यावेळी अहमदनगर महापालिकेची अग्निशमन विभागाचा एक बंब आला होता. मात्र या बंबाकडून आग वझणार नसल्याचे लक्षात आल्यावर मी शहराचे आमदार संग्राम जगताप यांना दुरध्वनीवरून कळविले. त्यांनी तातडीने एमआयडीसी अग्निशमन विभागाचा बंब पाठवून देण्याची व्यवस्था केली. एमआयडीसीच्या बंबाने आग अटोक्यात आणली. या आगीत किती नुकसान झाली आहे. हे उद्या सकाळीच स्पष्ट होईल.

- शिवाजी कर्डिले, ज्येष्ठ संचालक, अहमदनगर जिल्हा सहकारी बँक.

जिल्हा सहकारी बँकेतील लेखा परीक्षण विभाग व जिल्हा उपनिबंधक कार्यालय आहेत त्या मजल्याला आग लागली. यात लेखा परीक्षण विभागातील कागदपत्रे जळाली आहेत. जिल्हा उपनिबंधक कार्यालयालाची आगीत कोणतेही नुकसान झालेले नाही.

- दिग्विजय आहेर, जिल्हा उपनिबंधक, अहमदनगर.

सायंकाळी सहा नंतर कार्यालय सुटल्यावर बरेच कर्मचारी घरी गेले होते. लेखा परीक्षण कार्यालयातील सर्व कर्मचारी घरी गेले असताना ही आग लागल्याने जिवित हाणी झालेली नाही. लेखा परीक्षण कार्यालयातील कागदपत्रे जरी जळाली असली तरी या कागदपत्राच्या प्रती नाबार्ड, जिल्हा बँकेच्या शाखा, विविध सहकारी संस्था, सहकार विभागाची वरिष्ठ कार्यालये आदींत असतात. त्यामुळे आगीत नष्ट झालेली माहिती पुन्हा मिळविता येईल.

- रावसाहेब वर्पे, मुख्य कार्यकारी अधिकारी, अहमदनगर जिल्हा सहकारी बँक.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com