अखेर 'जीआर' निघाला; नरेंद्र पाटलांना पुन्हा मिळाले महामंडळाचे अध्यक्षपद

सातारा लोकसभा Satara Loksabha मतदारसंघातील निवडणूक लढण्यासाठी त्यांनी देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांच्या संमतीने 2019 ला शिवसेनेत Shivsena प्रवेश केला होता.
Narendra Patil
Narendra Patilsarkarnama

कराड : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटील यांची नियुक्ती दिल्याचा शासन निर्णय आज काढण्यात आला आहे. याबाबतचे पत्रही त्यांना देण्यात आले आहे. मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थन केल्याने श्री. पाटील यांच्याकडून महामंडळाचे अध्यक्षपद महाविकास आघाडी सरकारने काढून घेतले होते.

महाविकास आघाडीचे सरकार असताना नरेंद्र पाटील हे देवेंद्र फडणवीस समर्थक असल्याने त्यांच्याकडून महामंडळाचे अध्यक्षपद काढून घेण्यात आले होते. माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंधरा दिवसांपूर्वी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केली होती.

Narendra Patil
नरेंद्र पाटील म्हणतात; ठाकरे सरकारने मराठा समाजाची माफी मागावी

त्याचा शासन निर्णय आज निघाला असून आज याबाबतचे पत्र देण्यात आले. नरेंद्र पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता. मात्र, सातारा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लढण्यासाठी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीने 2019 ला शिवसेनेत प्रवेश केला होता. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळ दिले होते.

Narendra Patil
मराठा आरक्षण, महामंडळाच्या निधीतही ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा : नरेंद्र पाटील

महाविकास आघाडी सरकारमध्येही हे अध्यक्षपद आणि कॅबिनेट मंत्री दर्जा कायम होता. मात्र, त्यांनी अनेकदा उघडपणे देवेंद्र फडणवीस यांचे समर्थन केल्याने त्यांचे महामंडळाचे अध्यक्षपद काढून घेण्यात आले होते. त्यानंतर राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर पुन्हा एकदा नरेंद्र पाटील यांना महामंडळाचे अध्यक्षपद देऊन त्यांचा सन्मान केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com