अखेर 'ती' कोनशिला फोडल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल

अहमदनगर जिल्ह्याचे ( Ahmednagar District ) पालकमंत्री हसन मुश्रीफ ( Minister Hassan Mushrif ) यांनी तीन दिवसांपूर्वी शहरातील ग्रामीण रुग्णालयात प्राणवायू निर्मिती सयंत्राचे उदघाटन झाले.
The cornerstone was removed
The cornerstone was removedSanjay A. Kate

श्रीगोंदे ( अहमदनगर ) : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी तीन दिवसांपूर्वी शहरातील ग्रामीण रुग्णालयात प्राणवायू निर्मिती सयंत्राचे उदघाटन झाले. त्यासाठी आमदार पाचपुते यांनी स्थानिक विकास निधी दिला आहे. या कोनशिलेवर पाचपुते यांचे नाव खालच्या बाजूला टाकले गेल्याने संतप्त झालेल्या पाचपुते यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत विधानसभेत हक्कभंग आणण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर काल (सोमवारी) ही कोनशिला तेथे नव्हती. Finally, a complaint was lodged at the police station that the cornerstone had been broken

श्रीगोंदे शहरातील ग्रामीण रुग्णालयात उभारलेल्या ऑक्सिजन प्लांट उदघाटनात कोनशीलेवरील नावाच्या प्रोटोकॉलचा वाद रंगला असतानाच, कोनशिला अज्ञात व्यक्तींनी फोडल्याची तक्रार वैद्यकीय अधिकारी डॉ. संघर्ष राजुळे काल ( सोमवारी ) रात्री श्रीगोंदे पोलिसात दिली. त्यानुसार पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

शहरातील ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. मात्र तेथे लावलेल्या कोनशिलेवर आपले नाव प्रोटोकॉल नुसार न टाकता खालच्या बाजूला टाकल्याचा आरोप करत भाजपाचे नेते, आमदार बबनराव पाचपुते यांनी पालकमंत्र्यांच्या समोरच अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली होती. अधिकाऱ्यांविरुद्ध या प्रकरणी थेट विधानसभेत हक्कभंग दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

The cornerstone was removed
पालकमंत्र्यांची पाठ फिरताच कोनशिला निघाली

पाचपुते यांच्या आक्रमक भूमिकेनंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुनील पोखरणा यांनी काष्टी येथे जात पाचपुते यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात त्या परिसरात लावलेल्या दोन कोनशिला पैकी एक कोनशिला अज्ञात व्यक्तींनी फोडल्याचे समजताच दुसरी कोनशिला आरोग्य विभागाने काढून घेतली. यामुळे हे प्रकरण अधिकच चिघळले राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार यांनी या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना थेट फोन करीत आता हा पालकमंत्र्यांचा अपमान नाही का ? अशी विचारणा केल्याचे समजते. पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झालेल्या कार्यक्रमाची कोनशिला कुणाच्या आदेशाने काढली अशी विचारणा केल्यानंतर प्रशासन कात्रीत सापडले आहे.

या प्रकरणी समजलेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने आरोग्य विभागाला नोटीस बजावत याप्रकरणी तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची आदेश केल्याचे समजते त्यानंतर रात्री उशिरा डॉक्टर राजळे यांनी श्रीगोंदे पोलिसात तक्रार दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com