कोल्हापुरात १० डिसेंबरपर्यंत हे ४१५ जण असणार व्हीआयपी पर्सन

नगरपरिषद, नगरपंचायतींचे 338 आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीचे 77 मतदार आहेत.
कोल्हापुरात १० डिसेंबरपर्यंत हे ४१५ जण असणार व्हीआयपी पर्सन
Legislative Councilsarkarnama

कोल्हापूर : विधान परिषदेच्या कोल्हापूर (Kolhapur Legislative Council) मतदार संघामध्ये 416 पैकी 415 मतदारांची अंतिम यांदी प्रसिध्द करण्यात आली आहे. यामध्ये नगरपरिषद, नगरपंचायतींचे 338 आणि जिल्हा परिषद (Zilla Parishad) व पंचायत समितीचे 77 मतदारांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य विजय भोजे यांना उच्च न्यायालयाने मतदानाचा अधिकार नाकारला आहे. मतदान यादी अंतिम झाल्यानंतर मतदारांना भेटण्यासाठी उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी सगळेच उमेदवार येत आहेत. त्याच बरोबर त्यांच्यासाठी विविध ठिकाणी सहलिचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे ते १० डिसेंबरपर्यंत व्हीआयपी पर्सन ठरणार आहेत.

Legislative Council
`सतेज पाटील शपथेवर खोटे बोललेत! संपत्ती लपवली, घरपट्टी थकवली..`

जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापतींमध्ये सर्वाधिक मतदार करवीर 11 व हातकणंगले 11 तालुक्‍यात आहेत. तर सर्वात कमी गगनबावडा येथे 2 मतदार आहेत. नगरपरिषद व नगरपंचायत मतदारांमध्ये सर्वाधिक 67 मतदार इचलकरंजी तर सर्वात कमी मतदार हातकंणगले 19, शिरोळ 19 व पन्हाळा 19 आहेत.

नगरपरिषद व नगरपंचायत मतदार

इचलकरंजी 67 नगरसेवक, कागल 23, आजरा 20, हुपरी 21, जयसिंगपूर 28, चंदगड 20, गडहिंग्लज 22, मुरगूड 20, हातकणंगले 19, वडगाव 20, पन्हाळा 19, मलकापूर 20, शिरोळ 19, जयसिंगपूर 28, कुरूंदवाड 20 असे एकूण 338 मतदार आहेत.

जिल्हा परिषद सदस्य मतदार 

चंदगड 4, आजरा 3, गडहिंग्लज 5, राधानगरी 5, भुदरगड 4, कागल 5, हातकणंगले 11, करवीर 11, गगनबावडा 2, पन्हाळा 6, शाहुवाडी 4, शिरोळ 5 असे एकूण 65 मतदार आहेत.

Legislative Council
राजकारण तापले; पाटील अन् महाडिक गट आमने-सामने

पंचायत समिती सभापती मतदार

चंदगड, आजरा, गडहिंग्लज, राधानगरी, भुदरगड, कागल, हातकणंगले, करवीर, गगनबावडा, पन्हाळा, शाहुवाडी, शिरोळ प्रत्येकी 1 असे एकूण 12 मतदार आहेत. कोल्हापूरमध्ये विधान परिषदेसाठी काँग्रेसने गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने माजी आमदार अमल महाडिक यांना उमेदवारी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in