दीपाली सय्यद यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा... भाजप महिला मोर्चाची मागणी

या वक्तव्याबद्दल दीपाली सय्यद Dipali Sayyad यांना अटक केल्यास त्यांच्याकडून आणखी भरपूर माहिती मिळू शकेल.
दीपाली सय्यद यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा... भाजप महिला मोर्चाची मागणी
Satara BJP Mahila Morchasarkarnama

सातारा : दीपाली सय्यद यांनी पंतप्रधानांबद्दल जे वक्तव्य केले आहे, त्याबद्दल त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णाताई पाटील यांनी केली. याबाबतचे लेखी निवेदन त्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांच्याकडे दिले आहे.

निवेदनात भाजप महिला मोर्चाने म्हटले, की दीपाली सय्यद यांच्यावर राजद्रोह आणि हत्येचा कट रचल्याचा गुन्हा नोंद करण्यात यावा. दीपाली सय्यद यांची मुलाखत एका व्हिडिओ क्लिपद्वारे प्रसारित झाली आहे. त्यात त्या म्हणतात, की सोमय्या यांच्या जागी मोदी जरी असते तरी त्यांच्यावर हल्ला झाला असता. यावरून हे लक्षात येते, की हा हल्ला पूर्व नियोजित आहे.

Satara BJP Mahila Morcha
पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार? पंतप्रधान मोदींनीच आता सुचवला उपाय

काहीही झाले तरी हल्ला करायचाच या उद्देशाने त्या ठिकाणी जमाव गोळा केला गेला होता. त्यामुळे या वक्तव्याबद्दल दीपाली सय्यद यांना अटक केल्यास त्यांच्याकडून आणखी भरपूर माहिती मिळू शकेल. त्यांच्या या वक्तव्यामागे कोणत्या दहशतवादी संघटनेचा, शत्रूराष्ट्राचा हात आहे का, हेही तपासणे गरजेचे आहे.

Satara BJP Mahila Morcha
Video: छोटा आणि मोठा भाऊ कोण, याचा निकाल अमित शहांनी लावला; देवेद्र फडणवीस

त्यामुळे त्यांना अटक करून त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. या वेळी शहराध्यक्षा रीना भणगे, युवती मोर्चा जिल्हाध्यक्षा पायल टंकसाळे, बेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हाध्यक्षा अश्विनी हुबळीकर, ओबीसी मोर्चा युवती जिल्हाध्यक्षा वनिता पवार, श्वेता पवार, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in