
तिसगाव ( जि. अहमदनगर ) - देवराई (ता. पाथर्डी) येथे शनिवारी ( ता. 18 ) विविध कार्यकारी सेवा संस्थेची निवडणूक झाली. मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांची मिरवणूक काढली. त्यामुळे विरोधीगट संतापला. दोन गटांत तुंबळ मारामारी झाली. त्यामध्ये एक जण ठार झाला असून, चार जण जखमी झाले आहेत. ( Fighting after the election of the society: Swords and guns in the victory procession )
याबाबत सविस्तर माहिती अशी : शनिवारी सेवा संस्थेचे मतदान व लगेच निकाल होता. संध्याकाळी साडेपाचनंतर निवडणूक निकाल जाहीर झाला. त्यामध्ये बालाजी शेतकरी मंडळाचे 11 सदस्य निवडून आले, तर विरोधी बालाजी ग्रामविकास सहकार मंडळाच्या दोन जागा निवडून आल्या. निकालानंतर विजयी बालाजी शेतकरी मंडळाने विजयी मिरवणूक काढली.
डीजेच्या तालावर मिरवणूक चालू असतानाच विजयी झालेल्या व पराभव झालेल्या गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्यामध्ये एक जण ठार झाला, तर चार जण जखमी झाले. हाणामारीत तलवारीने वार झाले असून पिस्तुलाचा धाक दाखवण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.
या हाणामारीमध्ये तलवारीच्या हल्ल्यात आदिनाथ गोरक्ष पालवे हे मृत्युमुखी पडले असून विष्णू कैलास पालवे, वैभव कैलास पालवे, मनोहर नवनाथ पालवे व बाळू नवनाथ पालवे हे जखमी झाले आहेत. या हाणामारीनंतर मोठा गोंधळ उडाला व त्यानंतर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पाथर्डीचे पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती हाताळत आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.