कापसाच्या बोगस बियाणे विक्रीची शेतकऱ्यांना पडली धास्ती : कृषी विभाग अलर्ट

बनावट बियाणे पकडल्याने अहमदनगर जिल्हा परिषद कृषी विभाग अलर्ट झाला आहे.
कापसाच्या बोगस बियाणे विक्रीची शेतकऱ्यांना पडली धास्ती : कृषी विभाग अलर्ट
AhmednagarSarkarnama

अहमदनगर - मागीलवर्षी कापसाला मिळालेला चांगला दर, कांदा, ऊस उत्पादकाची झालेली अवस्था पाहता यंदा कापसाचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर मागणी असलेल्या कापसाच्या बोगस बियाणाची विक्री होण्याची शेतकऱ्यांना धास्ती आहे. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना काळजी घेण्याबाबत कृषी विभागाने सल्ला दिला आहे. शेजारच्या तालुक्यात बनावट बियाणे पकडल्याने अहमदनगर जिल्हा परिषद कृषी विभाग अलर्ट झाला आहे. ( Fear of selling bogus cotton seeds to farmers: Agriculture Department alert )

कापसाला गतवर्षी पहिल्यांदाच चांगला दर मिळाला आहे. कांद्याचे क्षेत्र वाढले, गतवर्षी खरिप, रब्बीतही कांद्याची दुप्पट लागवड झाली. मात्र दर नसल्याने कांदा उत्पादक हतबल आहे. ऊस उत्पादकाची आवस्था दयनीय झाली. कांदा, ऊस उत्पादकांना उत्पादन खर्चही निघाला नाही. त्याचा परिणाम यंदाच्या खरिपावर होणार असून साधारणपणे कापूस, सोयाबीन, तुरीचे क्षेत्र वाढू शकते असे अनुमान मांडले जात आहे. कापसाचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज बांधून कृषी विभागाने बियाणे मागणी केली आहे आहे.

Ahmednagar
पंकजा मुंडेच्या 'त्या' वक्तव्यावर धनंजय मुंडे म्हणाले...

बुधवारपासून (ता. 1) या बियाणाची विक्री सुरू झाली आहे. कापसाच्या बियाणाला अधिक मागणीचा विचार गतवर्षी अधिक उत्पादन देणाऱ्या काही ठराविक वाणाच्या बियाणाची विक्री होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या पैठण तालुक्यात दोन दिवसांपूर्वी बनावट बियाणे पकडल्याने अहमदनगर जिल्ह्यातील कापसाचे सर्वाधिक क्षेत्र असलेल्या शेवगाव, पाथर्डी तालुक्यातही अशा बियाण्याची विक्री होऊ शकते, अशी शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

त्यादृष्टीने आम्ही लक्ष ठेवून आहोत. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करण्यापूर्वी काळजी घ्यावी. शेतकऱ्यांनी मान्यता प्राप्त बियाणे विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करावी, पक्के बील, त्यावर खरेदीदार व विक्रेत्याची सही असावी, बियाणे सीलबंद पाकीट असावे, लागवडीसाठी घेतलेले बियाणे लागवड केल्यानंतरही थोडे बियाणे हंगाम संपेपर्यंत शिल्लक ठेवावे, सातबारा नावे असलेल्या शेतकर्‍यांच्या नावेच बियाणे खरेदी करावी, बीटी 3, बीटी 4 असा उल्लेख असलेले बियाणे आजिबात खरेदी करू नये, आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे कृषी विकास अधिकारी शंकर किरवे, मोहीम अधिकारी अमृत गांगर्डे यांनी केले आहे.

Ahmednagar
नेवासेमध्ये शिवसेनेला रोखण्याचे 'भाजप'पुढे मोठे आव्हान..

दुकानातून नव्हे, थेट विक्री

अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या पैठण तालुक्यांमध्ये बनावट बियाणे पकडल्यानंतर शेवगाव, पाथर्डी, बोधेगाव परिसरात बनावट बियाणे येऊ शकते अंदाज धरून कृषी विभाग दक्ष झाला आहे. बनावट बियाणांची विक्री करणारे कृषी सेवा केंद्रातून नव्हे तर थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधून बनावट बियाणे विक्री होऊ शकते असा अंदाज कृषी विभागातील एका अधिकार्‍याने व्यक्त केला. त्यामुळे शेतकऱ्यांनी मान्यताप्राप्त दुकानातूनच बियाणाची खरेदी करावी. काही तक्रार असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in