सासऱ्याचा रस्त्यात केला खुन : घरी जाऊन केला स्वयंपाक, मुलांना जेवूही घातले

चारित्र्यावर संशय घेणाऱ्या सासऱ्याचा सुनेने भर रस्त्यात खून ( Murder ) केला.
सासऱ्याचा रस्त्यात केला खुन : घरी जाऊन केला स्वयंपाक, मुलांना जेवूही घातले
crimeSarkarnama

अहमदनगर : चारित्र्यावर संशय घेणाऱ्या सासऱ्याचा सुनेने भर रस्त्यात खून केला. ही खळबळजनक घटना चिचोंडी पाटील ( ता. नगर ) शिवारात मंगळवारी ( ता. 23 ) पहाटे घडली. अर्जुन गोविंद हजारे ( वय 62, रा. चिचोंडी पाटील ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. Father-in-law killed in the street: went home and cooked, fed the children

आरोपी सून ज्योती अतुल हजारे ( रा. चिचोंडी पाटील ) हिच्या विरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी बाबासाहेब चंदू बनकर ( वय 42, रा. पिंपळगाव माळवी, ता. नगर ) यांनी फिर्याद दिली आहे.

crime
संतोष जगताप खून प्रकरणाच्या मास्टर माईंडला अटक; पाटसमधील एका व्यक्तीवरही संशय

चिचोंडी पाटील गावातील मेहकरी नदीच्या काठावर उत्तरेला सुमारे दीड किलोमीटरवर गराडी वस्ती आहे. या वस्तीवर दहा-बारा घरे आहेत. अर्जुन गोविंद हजारे हे कुटुंबीयांसह या ठिकाणी राहत होते. सात वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यांचा मुलगा अतुल हजारे याचा ज्योती हिच्याशी विवाह झाला. विवाहानंतर घरात सुखाचा संसार सुरू होता. त्यांच्या संसारवेलीवर दोन फुलेही उमलली.

पुढे अतुल याला दारूचे व्यसन जडले आणि सुखी संसाराला गालबोट लागले. त्यातूनच घरामध्ये भांडणे सुरू झाली. अतुल हा गेल्या दोन वर्षांपासून परागंदा आहे. त्याचा अजून पत्ता नाही. घरामध्ये अर्जुन हजारे, सून ज्योती आणि दोन मुलेच उरली. सासरे आणि सुनेमध्येही वारंवार भांडणे व्हायला लागली. या भांडणाला कधी कधी कारणही लागायचे नाही. सासरा अर्जुन हजारे हा सुनेच्या चारित्र्यावर संशय घेत होता. पोलिस सूत्रांचे तसे म्हणणे आहे.

crime
खासदार विखे म्हणाले, कर्डिले होणार आमदार...

मंगळवारी पहाटेच अडीच-तीनच्या सुमारास घरात सासरा आणि सुनेमध्ये भांडण जुंपले. या भांडणाचा आवाज लोकांना ऐकू येऊ लागला. त्यामुळे शेजारी राहणाऱ्यांनी ही माहिती अर्जुनच्या साडूचा मुलगा बाबासाहेब चंदू बनकर (वय ४२, रा. पिंपळगाव माळवी, ता. नगर) यांना दिली.

बाबासाहेब बनकर तातडीने पाच वाजेपर्यंत चिचोंडीत आले. त्यांनी घरात येऊन पाहिले असता अर्जुन हजारे निपचित पडलेले दिसले. त्यांनी ही माहिती नगर तालुका पोलिसांना दिली. त्यावेळी नगर तालुका पोलिसांचे पथक रात्रीची गस्त घालत होते. या पथकाने चिचोंडी गावात जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. प्रथमदर्शनी हा खून असल्याने, नगर तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे, नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक अजित पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी भेट दिली.

crime
नगर तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करा - शिवाजी कर्डिले

मुले झाली पोरकी

पहाटेच्या भांडणात सासरा गतप्राण झाला होता. घटनेनंतर आरोपी ज्योती ही घरातच होती. मुलांच्या ओढीने तिचा घरातून पाय निघत नव्हता. सकाळी उठल्यावर तिने मुलांसाठी स्वयंपाक केला. त्यांना जेवूही घातले. तिला पाच आणि आठ वर्षे वयाची दोन मुले आहेत.

पोलिसांची संवेदनशीलता

आरोपीला दोन लहान मुले असल्याने आणि घरात दुसरे कोणी नसल्याने अटक करण्यात अडचण निर्माण झाली. पोलिसांनी संवेदनशीलपणे परिस्थिती हाताळत तिच्या माहेरच्या लोकांना बोलावून घेतले. तिचे वडील आल्यानंतर दोन्ही मुलांचा ताबा त्यांच्याकडे दिला. आणि मगच ज्योतीला चौकशीसाठी नगर तालुका पोलिस ठाण्यात आणले. प्राथमिक चौकशीनंतर ती आरोपी असल्याचे आढळून आले.

- युवराज आठरे, सहायक पोलिस निरीक्षक, नगर तालुका

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in