Mahabaleshwar : मुकदेव घाटात कामगारांचा टेम्पो दरीत कोसळला; चौघांची प्रकृती गंभीर

Buldhana, Akola बुलढाणा व अकोला भागातून मजूर घेऊन जाणाऱ्या 407 टेम्पोला अपघात झाला असून जखमींमध्ये लहान मुलांसह 40 कामगारांचा समावेश आहे.
Mahabaleshwar Accident
Mahabaleshwar Accidentsarkarnama

Satara News : महाबळेश्वर Mahabaleshwar तालुक्यातील मुकदेव गावानजीक तीव्र उतारावर बुलढाणा व अकोला भागातून मजूर घेऊन जाणाऱ्या 407 टेम्पो दरीत कोसळला असून या अपघातात Accident अनेक कामगार गंभीर जखमी झाले आहेत. टेम्पोत सुमारे 40 लोक असल्याची प्राथमिक माहिती असून, जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. पोलिसांसह Police सह्याद्री ट्रेकर्सचे जवान संजय पार्टे, दीपक जाधव, गायकवाड व ग्रामस्थांनी अपघातस्थळी मदतकार्य सुरु केले असून जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातात टेम्पोतील सुमारे 40 लोक असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. रस्ते कामासाठी हे मजूर महाबळेश्वर येथे आले असल्याची माहिती मिळत असून, आज (शनिवार) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास मुकदेव घाटात हा अपघात झाला.

या अपघातातील जखमींना तळदेव येथे तर काहींना महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. यातील दोन गंभीर जखमी लहान मुलांना सातारा येथे पाठविण्यात आले आहे. सह्याद्री ट्रेकर्सचे जवान संजय पार्टे, दिपक जाधव, गायकवाड व ग्रामस्थांनी अपघातस्थळी मदतकार्य केले.

Mahabaleshwar Accident
ZP Satara : शिक्षक भरतीत ६५ कोटींचा घोटाळा ; ७० शिक्षकांना चुकीची मान्यता ; आमदार शिंदेंचा गौप्यस्फोट

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com