ओला दुष्काळ जाहीरच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी हाती घेतला 'लाल झेंडा'

अखिल भारतीय किसान सभेचे तीन दिवसीय राज्य अधिवेशन आज पासून अकोले येथे सुरू झाले.
Farmers take up 'red flag'
Farmers take up 'red flag'Sarkarnama

CPI (M) : अखिल भारतीय किसान सभेचे तीन दिवसीय राज्य अधिवेशन आज पासून अकोले येथे सुरू झाले. या अधिवेशनापूर्वी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा ही प्रमुख मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली. या मागणीसाठी अकोले बाजारतळ येथून रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी, ग्रामीण श्रमिक व ग्रामीण कामगार सहभागी झाले. शेतकरी रॅलीनंतर महालक्ष्मी मंगल कार्यालय येथे जाहीर सभा घेण्यात आली.

अखिल भारतीय किसान सभेच्या अधिवेशनासाठी किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, केंद्रीय कोषाध्यक्ष पी. कृष्णप्रसाद, किसान सभेचे नेते जे.पी. गावीत, किसन गुजर, डॉ. अजित नवले, आमदार विनोद निकोले यांच्यासह ६५ राज्य कौन्सिल सदस्य व महाराष्ट्रभरातून २३ जिल्हा अधिवेशनांमध्ये निवडण्यात आलेले ३०० प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. या अधिवेशनात ओला दुष्काळ, शेती संकट व ज्वलंत शेतकरी प्रश्नांवर विचार विनिमय करून शेतकरी आंदोलनाच्या वाटचालीची पुढील दिशा निश्चित करणार आहेत.

Farmers take up 'red flag'
राज्यपाल भाजपच्या कारस्थानात सहभागी : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा आरोप

डॉ. अजित नवले यांनी सांगितले की, राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांची तयार झालेली पिके पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. राज्यभर ३६ लाख हेक्टर वरील पिके बरबाद झाली आहेत. शेतकऱ्यांना अशा आपत्तीच्या काळात सरकारने तातडीने भरपाई व मदत देणे अपेक्षित असताना राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार मात्र केवळ घोषणा व दिखावा करत आहे. शेतकऱ्यांच्या व सामान्य जनतेच्या मनात सरकारच्या या दुर्लक्षाच्या विरोधात तीव्र संताप खदखदत आहे.

Farmers take up 'red flag'
Video : वाईन नाहीतर दुधाला प्राधान्य द्या : अजित नवले

केंद्रातील मोदी सरकारही सातत्याने शेतकरी विरोधी व कॉर्पोरेटधार्जिणे धोरण राबवीत आहे. देशभर यामुळे शेती संकट अधिक तीव्र होत असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. एक वर्षभराच्या ऐतिहासिक व विजयी शेतकरी आंदोलनामुळे मोदी सरकारला तीन कृषी कायदे रद्द करावे लागले. मात्र शेतकऱ्यांना कायदेशीर व रास्त आधारभाव, कर्जमाफी, सर्वंकष पीक विमा योजना, वाढीव पेन्शन, सिंचन, वीज, रेशन व अन्नसुरक्षा असे अनेक ज्वलंत प्रश्न प्रलंबित आहेत. दुसरीकडे वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी, देवस्थान, इनाम, वरकस व इतर जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करणे हे सुद्धा जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. त्याचबरोबर देशाची राज्यघटना, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, आर्थिक-सामाजिक न्याय यांचे संरक्षण आणि संवर्धन हे आज कळीचे प्रश्न बनले आहेत. किसान सभेच्या अधिवेशनात या सर्व प्रश्नांवर सखोल चर्चा करून लढ्याची पुढील दिशा ठरणार असल्याचे, डॉ. नवले यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in