Satara : उरमोडीच्या पाण्यापासून शेतकरी वंचित; शिवेंद्रसिंहराजेंनी घेतली ही भूमिका...

उरमोडी प्रकल्पांतर्गत उरमोडी Urmodi dam Cannel उजवा कालवा अस्‍तरीकरण, वितरण व्यवस्था सहा महिन्‍यात पुर्ण करणे,जलाशयातील उपसा सिंचन योजना Upsa Irrigation Scheme त्वरित कार्यान्वित करणे या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करत ती तात्‍काळ मार्गी लावण्‍याची मागणी शिवेंद्रसिंहराजेंनी Shivendraraje Bhosale केली.
Pune Meeting
Pune MeetingSarkarnama

सातारा : उरमोडी प्रकल्पांतर्गत सातारा तालुक्यातील उजव्या कालव्याचे अस्तरीकरणाचे काम, पाणी वितरण व्यवस्था, उपसा सिंचन योजना आदी कामे अजून पूर्ण झालेली नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी उरमोडीच्या पाण्यापासून वंचित आहे. उरमोडी प्रकल्पांतर्गत सातारा तालुक्यातील सर्व कामे तातडीने पूर्ण करा, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुणे येथील कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता डॉ. हेमंत धुमाळ यांना केली.

याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन डॉ. धुमाळ यांनी दिले. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी काल सातारा तालुक्याच्या सिंचन प्रश्नाच्या अनुषंगाने पुणे येथे कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयात मुख्य अभियंता डॉ. हेमंत धुमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंचन आढावा बैठक घेतली.

या बैठकीला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधिक्षक अभियंता जयंत शिंदे यांच्यासह कृष्णा खोरे विकास महामंडळाचे आणि सातारा पाटबंधारे मंडळाचे संबंधित सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Pune Meeting
Satara : शिवाजी महाराजांचे स्मारक सातारा पालिकेकडे हस्तांतरीत करा... शिवेंद्रसिंहराजे

बैठकीत उरमोडी प्रकल्पांतर्गत उरमोडी उजवा कालवा अस्‍तरीकरण, वितरण व्यवस्था सहा महिन्‍यात पुर्ण करणे,जलाशयातील उपसा सिंचन योजना त्वरित कार्यान्वित करणे या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करत ती तात्‍काळ मार्गी लावण्‍याची मागणी शिवेंद्रसिंहराजेंनी केली. मागणीबाबत डॉ. धुमाळ यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन कार्यवाही होईल,असे सांगितले.

Pune Meeting
Udayanraje Bhosale : इंग्लंडमधील भवानी तलवारीबाबत उदयनराजे भोसले म्हणाले..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com