दामाजी कारखान्याचं राजकारण तापलं; निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची (Sant Damaji Co-operative Sugar Factory) पंचवार्षिक निवडणूक होणार आहे.
दामाजी कारखान्याचं राजकारण तापलं; निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
Sant Damaji Co-operative Sugar Factorysarkarnama

मंगळवेढा : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या (Sant Damaji Co-operative Sugar Factory election) पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादीवरील हरकतीबाबत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांनी (District Election Officer) कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून माहिती उपलब्ध करून ती सभासदांना सुनावणी संपेपर्यंत दिली नाही. केवळ कागदी घोडे नाचवन्याचे काम करीत असून त्यांचे काम संशयास्पद असल्याने त्यांच्यासह व इतर संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आयुक्ताकडे शेतकरी संघटनेचे नेते सिद्धेश्वर हेंबाडे (Siddheshwar Hembade) यांनी केली आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्याआधीच वेगवेगळ्या कारणाने दामाजीचा आखाडा आता तापू लागला आहे.

यासंदर्भात राज्य निवडणूक प्राधिकरणाकडे केलेल्या तक्रारीत हेंबाडे यांनी म्हटले आहे ''की जिल्हा निवडणूक अधिकारी हे संत दामाजी कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी चुकीच्या पद्धतीने कामकाज पाहत असून ते कारखान्याचे निबंधक आहेत. त्यामुळे त्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी ते कारखाना व्यवस्थापनाला अनपेक्षितपणे मदत करीत आहेत. कारखाना प्रशासनाला व विद्यमान संचालक मंडळाला अप्रत्यक्षरीत्या मदत होईल, अशी प्रामाणिक भूमिका पार पाडत आहेत. सुनावणीच्या वेळी मूळ रेकॉर्ड कारखाना व्यवस्थापनास हजर होण्यासाठी भाग पाडायला हवे होते. मात्र, तसे न करता सुनावणी संपल्यानंतर सभासदांचा रोष लक्षात घेऊन केवळ कारखान्याच्या व्यवस्थापनाला थातूर-मातूर लेखी पत्र देऊन सभासदांची दिशाभूल केली आहे, असा आरोप हेंबाडे यांनी केला आहे.

Sant Damaji Co-operative Sugar Factory
त्या व्हायरल पत्रामुळे कृष्ण प्रकाश व्यतिथ : मी केलेल्या कारवाईमुळे नाखूष व्यक्तींचा हा उद्योग!

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नोटीस बोर्डावर ५ ऊस उत्पादक गट निहाय यादी प्रसिद्ध करण्याची जबाबदारी असताना देखील त्यांनी ती पार पाडली नाही. कसूर केली 31 मार्च 2020 च्या लेखापरीक्षण अहवालात अ वर्ग ऊस उत्पादक सभासद संख्या ही 28 हजार 193 असून कारखान्याने महाराष्ट्र सहकारी कायदा अधिनियम 1960 कलम 27(10) व 73 प्रमाणे सुमारे 2 हजार 351 सभासद अपात्र असल्याची तोंडी माहिती कारखाना प्रशासन विभागाकडून देण्यात आली आहे.

Sant Damaji Co-operative Sugar Factory
महाविकास आघाडीची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार ? उद्धव ठाकरे की शरद पवार..

त्यामुळे 25 हजार 842 सभासदांची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध होणे अपेक्षित असताना, कारखाना प्रशासनाकडून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी 28 हजार 157 सभासदांची प्रारूप यादी प्रसिद्ध केली. यादी प्रसिद्ध करताना आपल्या कार्यालयाच्या आदेशाचे पुरता उल्लंघन झाले, जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी लेखी तक्रारी करून देखील कारखान्याच्या लेखापरीक्षण अहवालातील सभासद संख्या व मतदार यादी तयार करताना अपात्र ठरवण्यात आलेल्या सभासदांची संख्या व प्रसिद्ध झालेली सदोष मतदार यादीतील संख्या याची पडताळणी करण्याची अर्जदाराने मागणी करून सुद्धा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सुनावणीच्या वेळी देखील नोंद घेतली नाही. त्यामुळे त्यांच्यावर व संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हेंबाडे यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.