चेक बाऊन्स होताच संजयकाकांच्या घरावर मोर्चा; शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट..

कारखान्याने थकित ऊस बिलाचे चेक बाऊन्स झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
Sanjay-kaka-patil
Sanjay-kaka-patilSarkarnama

सांगली : शेतकऱ्यांनी थकित ऊस बिलासाठी देण्यात आलेले चेक बाऊन्स झाल्याने शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहे. या निषेधार्थ आज (ता.21 जानेवारी) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Farmers Association) वतीने व शेतकऱ्यांनी भाजप (BJP) खासदार संजय काका पाटील (Sanjay Patil) यांच्या तासगाव तालुक्यातील चिंचणी येथील घरावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलिसांनी (Sangli Police) मोर्चा अडवण्याचा प्रयत्न केला असता आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली आहे.

Sanjay-kaka-patil
कोल्हे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा!

तासगाव व नागेवाडी कारखान्याच्या थकित ऊस बिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने याआधी आंदोलन करण्यात आले होते. यामुळे शेतकऱ्यांची  सुमारे 30 कोटीची ऊस बिले मिळवून देण्यात आली आली. मात्र, अद्यापही काही शेतकऱ्यांची ऊसबिले थकितच आहेत. यासाठी 23 डिसेंबर 2021 रोजी तासगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी शेतकऱ्यांना थकित ऊस बिलाची 15 जानेवारीचे धनादेश (चेक) देण्यात आले होते. मात्र, ते वटलेच नाहीत. त्यामुळे शेतकरी कमालीचे चिडले असून संजयकाकांनी पुन्हा शेतकऱ्यांना फसवले, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. आज शेतकऱ्यांनी पाटील यांच्या निषेधार्थ चिंचणी येथील त्यांच्या घरावर मोर्चा काढला होता. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला असता आंदोलक शेतकरी आणि पोलिसांध्ये झटापट झाली आहे. यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Sanjay-kaka-patil
Why I Killed Gandhi: शरद पवारांकडून अमोल कोल्हेंची पाठराखण

कारखान्याने थकित बिलाचे दिलेले 15 जानेवारीचे चेक बाऊन्स झाल्याने पाटील यांनी आम्हाला फसवले आहे. आता तासगाव आणि नागेवाडी कारखान्याच्या थकित ऊस बिलासाठी 2500 नाही 2850 घेणार आणि मगच उठणार, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. चिंचणी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही. असा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने आता याप्रकरणी काय तोडगा निघणार आणि खासदार पाटील काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com