ऊर्जा राज्यमंत्र्यांच्या तालुक्यात शेतकरी आक्रमक : आम्हाला नक्षलवादी बनवू नका

राज्यभरात महावितरणकडून सक्तीने थकीत वीज बिल वसुलीची मोहीम राबविली जात आहे.
Ravindra More
Ravindra MoreSarkarnama

अहमदनगर - राज्यभरात महावितरणकडून सक्तीने थकीत वीज बिल वसुलीची मोहीम राबविली जात आहे. या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे महावितरण कार्यालयाला टाळे ठोकत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. Farmers aggressive in Minister of State's taluka: Don't make us Naxalites

राहुरी विधानसभा मतदार संघात प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) हे आमदार आहेत. त्यांच्याकडे ऊर्जा राज्यमंत्री पदाची जबाबदारी आहे. त्यांच्याच तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महावितरणाच्या सक्तीने थकबाकी वसुली मोहिमेला विरोध केला आहे. आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास अचानक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी महावितरण कार्यालयात प्रवेश केला. त्यांच्या समवेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी होते. मोरे यांनी महावितरण कार्यालयाचे गेट बंद करत त्याला टाळे ठोकले. त्यामुळे महावितरण अधिकाऱ्यांना कोंडले गेले.

Ravindra More
ऊसदर आंदोलन पुन्हा पेटले ; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

महावितरण अधिकारी व पोलिसांनी मोरे यांना समजाविण्याचा प्रयत्न केले मात्र ते आंदोलनावर ठाम होते. यावेळी रवींद्र मोरे पोलिस अधिकाऱ्यांना म्हणाले, आमच्याकडे थकीत वीज बिल भरण्या एवढे पैसे नाहीत. शेतकऱ्यांची स्थिती बिकट आहे. शेतकऱ्यांएवढी वाईट स्थिती कोणाचीही नाही. शेतीमालाला भाव नाही. तुम्ही शासकीय अधिकारी आहात त्यामुळे तुम्हाला पगार आहे. शेतकऱ्यांना पगार नाही. साखर कारखान्यांकडून उसाचे पेमेंट वेळेवर मिळत नाही. शेतात ऊस उभे आहेत. ऊसतोडणी मजूर ऊस तोडण्यासाठी पैसे मागत आहेत. अशी स्थिती राहिली तर शेतकऱ्यांना नक्षलवादी बनवू नका. आमच्याकडे थकीत वीज बिल भरण्यासाठी पैसे नाहीत. तुम्हाला जे करायचे ते करा. आम्ही दडपशाहीला झुकणार नाही.

Ravindra More
स्वाभिमानी शेतकरी संघटना का म्हणते, "जनतेचा उद्रेक होईल'

मोरे पुढे म्हणाले, आमच्याकडे पैसे आल्यावर थकीत वीज बिल भरण्यास आम्ही तयार आहोत. पण तुम्ही सक्ती केल्यास आम्ही आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशारा मोरे यांनी महावितरण व पोलिस प्रशासनाला देत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com