गर्जना करणाऱ्यांना अडीच वर्षात पाणी आणण्यात अपयश....प्रभाकर देशमुख

जिहे कटापूरच्या Jihe Katapur कामाच्या टेंडरसाठी Tender काहीजण उपोषणाच्या वल्गना करत आहेत, अशी टीका श्री. देशमुख Prabhakar Deshmukh यांनी केली आहे.
Prabhakar Deshmukh
Prabhakar Deshmukhsarkarnama

बिजवडी : जिहे कटापूर सिंचन योजनेचे पाणी सहा महिन्यात उत्तर माण परिसरात आणणार अशा खोट्या गर्जना करत निवडणूका लढवणारे अडीच वर्षे झाली तरी पाणी आणू शकले नाहीत. टेंभूचे पाणी आरक्षित करण्यात आम्हाला यश मिळाले आहे. जिहे कटापूरचे पाणी आणण्याच्या बोगद्याचे कामही अंतीम टप्प्यात असून लवकरच हे पाणी आंधळी धरणात येईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते व माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी दिली आहे.

बिजवडी (ता.माण) येथील सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रजोत भोसले, उपाध्यक्षपदी बापूराव दडस यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात श्री. देशमुख बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, महानंद दूध डेअरीचे डी. के. पवार, सिध्दनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष सुनिल पोळ, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एम.के.भोसले, पै.संदीप मांडवे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासो सावंत, यांची प्रमुख उपस्थिती होती.

Prabhakar Deshmukh
प्रभाकर देशमुख यांची राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावर निवड

प्रभाकर देशमुख म्हणाले, जिहे कटापूरच्या कामाच्या टेंडरसाठी काहीजण उपोषणाच्या वल्गना करत आहेत. त्यांच्या वल्गनामुळे नाहीतर या भागातील जनतेला आधार देत त्यांचे संसार उभे करण्यासाठी लवकरच या कामाचे टेंडर निघणार आहे. टेंडर अडवून काम बंद पाडण्याचे काम राष्ट्रवादी कधीच करत नाही. बिजवडी परिसरातील गावे या योजनेत आरक्षित नसले तरी नवीन पाणी लवादावेळी या गावांनाही जिहे कटापूरचे पाणी आरक्षित करण्यासाठी आम्ही प्रसंगी सरकारविरोधात संघर्ष उभारत या भागाला पाणी देण्यासाठी कटिबध्द आहे.

Prabhakar Deshmukh
भाजप आमदार जयकुमार गोरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; उच्च न्यायालयाचा दणका

अनिल देसाई म्हणाले, विकास सेवा सोसायटीची मातृसंस्था जिल्हा बँक आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत. सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी सोसायटीच्या माध्यमातून गावचा विकास साधावा. टॅक्स टू मॅक्स या योजनेतंर्गत एक कोटीचे व्यवसायासाठी एक टक्का व्याजदराने कर्ज मिळते. मराठा समाजाच्या मुलांना उद्योग,व्यवसायासाठी १५ लाख तर इतर समाजातील मुलांनाही दहा लाख रूपये बिनव्याजी कर्ज दिले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com