बंद होता की नाही हे पाहायला फडणविसांनी साताऱ्यात यायला हवं होतं...

केंद्र सरकारने जी शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका घेतली आहे. केंद्रातल्या मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले आहे, त्यांचा महाराष्ट्रातुन, सातारा जिल्ह्यातुन उत्स्फुर्तपणे निषेध पाळण्यात आला आहे.
बंद होता की नाही हे पाहायला फडणविसांनी साताऱ्यात यायला हवं होतं...
Shambhuraj Desai, Devendra Fadanvissarkarnama

कऱ्हाड : विरोधक जर सातारा जिल्ह्यात आले तर, त्यांना बंदला प्रतिसाद मिळाला की नाही हे कळले असते. आज (सोमवारी) दिवसभर लोकांनी १०० टक्के बंद पाळला आहे. विरोधकांना केवळ महाविकास आघाडीवर टीका करणे, महाविकास आघाडीने एखादा विषय हातात घेतला की तो कशा पध्दतीने हाणुन पाडता येईल एवढेच काम आहे. विरोधकांचा त्याला विरोध असेल तर शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ जो महाराष्ट्रातील जनतेने बंदला पाठिंबा दिला होता, तो त्यांना मान्य नाही, असा त्याचा अर्थ काढावा लागेल, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी कऱ्हाड (जि. सातारा) लगावला.

बंद दरम्यान, झाल्यानंतर गृहराज्यमंत्री देसाई यांनी आज कऱ्हाड शहरातील बंदोबस्ताची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री देसाई म्हणाले, केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे केले आहेत. त्याविरोधात उत्तर भारतात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. ते आंदोलन सुरु असताना केंद्र सरकारमधील एका राज्यमंत्र्यांच्या मुलाकडुन नऊ शेतकऱ्यांना गाडी अंगावर घालुन चिरडण्यात आले. त्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने 'महाराष्ट्र बंद' चे आवाहन केले होते. सकाळपासुन सातारा जिल्ह्यातील पोलिस बंदोबस्ताची पाहणी केली.

Shambhuraj Desai, Devendra Fadanvis
अजित पवारांच्या कारखान्यांवरील छापेमारीमागेचे खरे सूत्रधार देवेंद्र फडणवीस!

शांततेच्या मार्गाने लोकांनीही 'बंद' पाळला आहे. दुपारनंतर काही ठिकाणी थोड्या प्रमाणात दुकाने सुरु झाली आहेत. मात्र सकाळपासूनच बंदमध्ये सहभागी होत जिल्ह्यातील नागरीकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जी शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका घेतली आहे. केंद्रातल्या मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले आहे, त्यांचा महाराष्ट्रातुन, सातारा जिल्ह्यातुन उत्स्फुर्तपणे निषेध पाळण्यात आला आहे.

Shambhuraj Desai, Devendra Fadanvis
'महाविकास'च्या बंदला प्रतिसाद; सातारा, कराड, वाईत मोर्चा

विरोधी पक्षनेते फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी बंदला प्रतिसाद मिळालेला नाही, बंद फसला, या टीकेवर मंत्री देसाई म्हणाले, विरोधक जर सातारा जिल्ह्यात आले तर त्यांना बंदचा प्रतिसाद किती होता हे कळले असते. सकाळपासुन दुपारपर्यंत लोकांनी १०० टक्के बंद पाळला. विरोधकांना केवळ महाविकास आघाडीवर टीका करणे, महाविकास आघाडीने एखादा विषय हातात घेतला की तो कशा पध्दतीने हाणुन पाडता येईल एवढेच पाहतात. विरोधकांचा त्याला विरोध असेल तर शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ जो महाराष्ट्रातील जनतेने बंदला पाठिंबा दिला, तो त्यांना मान्य नाही असाच त्याचा अर्थ काढावा लागेल.

Shambhuraj Desai, Devendra Fadanvis
शिवसेना करणार भाजपची कोंडी; उत्तर प्रदेश अन् गोवा निवडणूक लढवणार 

खुर्च्या आपटल्याची योग्य दखल घेणार....

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यस्तरावरुन शांततेत 'बंद' करण्याचे आवाहन केले होते. सर्वांना याबाबतच्या सुचना केल्या होत्या. साताऱ्यामध्ये खुर्च्या आपटण्याचा प्रकार झाला. त्याला स्थानिक अधिकाऱ्यांनी मज्जाव केला. कायदा व सुव्यवस्था कोणीही हाती घेऊन नये, अशा सुचना महाविकास आघाडीने केल्या होत्या. मात्र, तरीही असा प्रकार घडला असेल तर त्याची माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा गृहराज्यमंत्री देसाई यांनी दिला.

Related Stories

No stories found.