मनसेच्या दोन माजी पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी

अहमदनगर जिल्ह्यातील मनसेच्या दोन माजी पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
MNS
MNS Sarkarnama

अहमदनगर, ता. २ ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ( MNS ) नेते नितीन सरदेसाई यांनी आदेश काढून अहमदनगर जिल्ह्यातील मनसेच्या दोन माजी पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. किरण पालवे व सतीश मगर असे या दोघांचे नाव आहे.

किरण पालवे हे पाथर्डी तालुक्यातील असून ते महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. तर सतीश मगर हे शेवगाव तालुक्यातील असून मनसेच्या रस्ते अस्थापनाचे जिल्हा संघटक आहेत. या दोघांनीही पक्षाचे पदाधिकारी व पक्षाबाबत बदनामी करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यामुळे त्यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.

MNS
MNS : राज ठाकरेंनी केली पदाधिकाऱ्यांची कान उघाडणी ; दिला 'हा' आदेश

पक्षाने या दोघांनाही दोन वर्षांपूर्वी पक्ष विरोधी कारवाया करत असल्याने पदावरून दूर केले होते. पक्ष आदेशाच्या विरोधात कामकाज करणे व सोशल मीडियावर पदाधिकाऱ्यांची व पक्षाची बदनामी केल्याने त्यांना अखेर आज पक्षातून काढून टाकण्यात आले. या दोघांच्या पक्ष विरोधी कारवायांबाबत जिल्ह्यातून पक्ष श्रेष्ठींकडे अहवाल गेला होता. पक्ष श्रेष्ठींनी पुरावे व अहवाल तपासून ही कारवाई आज केली.

MNS
MNS : बेडका सारख्या उड्या कोण मारतं ? ; राज ठाकरेंना सरडा म्हणणाऱ्या पेडणेकरांवर हल्लाबोल

या कारवाईमुळे मनसेतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. जिल्ह्यात पक्ष वाढविण्याचे काम मनसे पदाधिकाऱ्यांकडून जोमात सुरू असतानाच ही कारवाई झाली आहे. आगामी निवडणुकांसाठी पदाधिकाऱ्यांकडून पक्ष बांधणी सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in