वनवास संपला : राम शिंदेंना मंत्रीपदाचे वेध

अडीच वर्षांचा वनवास संपवून राम शिंदे ( Ram Shinde ) यांना विधानपरिषदेची आमदारकी मिळाली.
Ram Shinde
Ram Shinde Sarkarnama

जामखेड ( जि. अहमदनगर ) - भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्या राजकीय कौशल्यामुळे अडीच वर्षांचा वनवास संपवून राम शिंदे ( Ram Shinde ) यांना विधानपरिषदेची आमदारकी मिळाली; त्यांचे कर्जत-जामखेडमध्ये अभूतपूर्व स्वागत झाले. या स्वागताच्या रॅलीला कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवत उत्स्फुर्त प्रतिसाद दर्शविला. या मागे अनेक कारणे असल्याची चर्चा सुरू असली तरी मागील अडीच वर्षांपासून गुलालाची असलेली 'प्रतीक्षा' हेच कारण लक्षवेधी ठरणारे आहे. ( Exile is over: Now Ram Shinde is looking for a ministerial post )

आमदार राम शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीतीला 1996 पासून सुरवात झाली. चौंडीचे सरपंच ते राज्याच्या मंत्री मंडळात सात खात्याचे कॅबिनेट मंत्री असा चढता राजकीय आलेख त्यांचा राहिला. मात्र 2019 ला त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील ग्रहण लागले आणि विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांकडून त्यांचा पराभव झाला. हा पराभव आमदार शिंदेंसह कार्यकर्त्यांच्या मोठा जिव्हारी लागला. तदनंतर अडीच वर्षांच्या काळात कर्जत-जामखेडच्या राजकारणात आमदार रोहित पवारांचा 'बोलबाला' सुरू झाला. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांनी दोन्ही पंचायत समित्या व जामखेड नगरपलिकेत सत्तांतर घडवून आणले, तर कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीत आमदार पवारांमुळे भाजपचा दारुण पराभव झाला.

Ram Shinde
तीन वर्षांनंतर राम शिंदे पुन्हा आमदार : कर्जत-जामखेडच्या भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दोन्ही जागा 'भाजप'ला मिळाल्या मात्र जामखेडच्या संचालकाने पक्षांतर करुन आमदार रोहित पवारांची साथ केली. येथील राजकारणाचा 'डंका' राज्यभर पोहोचला आणि आमदार पवार अधिकच लोकप्रिय झाले. मात्र येथील राजकारणाच्या पटलावर राम शिंदेंची सर्व आघाड्यांवर पिछेहाटच झाली. त्यांना व त्यांच्या समर्थकांना 'गुलाला' पासून काहिसे दूर रहावे लागले.

हे कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या जिव्हारी लागले. राजकीय पडझडीत मात्र पक्षाने त्यांच्याकडे पाठ फिरवली नाही. शिंदेंना पक्ष संघटनेत प्रदेश उपाध्यक्ष, कोअर कमिटी सदस्य या पदावर काम करण्याची संधी दिली. त्यामुळे कर्जत-जामखेडच्या राजकारणात शिंदेंच्या हातून एकेक संस्था विद्यमान आमदार रोहित पवारांकडे जात असताना देखील आमदार शिंदे हे प्रदेशाच्या राजकारणात स्वतःचे राजकीय 'वलय व वजन' वाढविण्यात यशस्वी झाले.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मर्जी सांभाळत त्यांच्या कंपूत सामील झाले. फडणविसांच्या मर्जीमुळेच शिंदेंना विधानपरिषदेवर संधी मिळाली आणि आता राज्यात सत्तांतर झाल्यास मंत्री पद मिळाले तर नवल वाटायला नको..!

Ram Shinde
शरद पवार व रोहित पवारांनी अहिल्यादेवी होळकरांची जयंती हायजॅक करण्याचा प्रयत्न केला - राम शिंदे

शिंदेंचे राजकीय ग्रहण सुटले; मंत्री पद लागले खुनावू...!

आमदार शिंदेंना विधानपरिषदेवर आमदार म्हणून संधी मिळाली आणि त्यांच्या स्वागताने कर्जत-जामखेड दणाणून सोडले. ऐकीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांना शिंदेंना संधी मिळते आहे. याचा आनंद तर दुसरीकडे महाआघाडीचे सरकार अडचणीत येत असल्याचे चित्र निर्माण झाल्याने वेगळेच समाधान आहे. राज्यात सत्तांतर होणार आणि पुन्हा शिंदेंना मंत्री पद मिळणार यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह अधिकच होता.

Ram Shinde
राम शिंदे म्हणाले, अहल्यादेवी होळकरांच्या जयंती उत्सवात रोहित पवारांनी राजकारण घुसडले...

हा तर फडणवीसांच्या 2024 च्या प्लँनचा भाग...!

राम शिंदे यांना मिळालेल्या विधानपरिषदेला कर्जत-जामखेडचे विद्यमान आमदार रोहित पवार यांचा मतदारसंघात वाढता प्रभाव व राज्याच्या राजकारणात होत असलेला प्रवेश हे देखील एक कारण आहे. आमदार रोहित यांनी मतदारसंघातील गावे पिंजून काढली आहेत. त्यांना वडील राजेंद्र पवार आणि आई सुनंदाताई पवार यांची मोठी मदत मिळत आहे. तसेच खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे या मतदारसंघावर विशेष लक्ष आहे. यातून आमदार रोहित पवारांच्या राज्याच्या राजकीय प्रवेशाला उभारी देण्याचे काम पवार कुटुंबाकडून होत आहे. तर दुसरीकडे आमदार पवारांची युवकांमध्ये वाढणारी 'क्रेझ' अन्य पक्षासाठी लक्षवेधी ठरत आहे.

आमदार पवारांना 2024 मध्ये मतदारसंघात जखडून ठेवण्यासाठी भाजपाने राम शिंदे यांना ताकत दिली आहे. त्यातूनच त्यांना विधानपरिषद मिळाली आहे. 2024 ला पुन्हा शिंदेंच्या माध्यमातून कर्जत-जामखेडमधून तगडे आव्हान उभे करून निसटलेला पारंपरिक मतदारसंघ पुन्हा भाजपला मिळवायचा आहे.

Ram Shinde
रोहित पवार- राम शिंदे लढतीत सुरेश धसांचे महत्व कायम!

भाजपचा प्लॅन

आमदार राम शिंदे यांना विधान परिषद देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन पहिल्यांदा करून त्यांना कर्जत-जामखेडमध्ये पक्षसंघटन अधिक मजबूत करण्याची जबाबदारी पक्षाने त्यांच्या खांद्यावर सोपविली आहे. आमदार पवारांच्या विरोधात आमदार शिंदेची मदत घेऊन भाजपकडून आमदार सुरेश धस यांना कर्जत-जामखेडच्या रिंगणात उतरविण्याचा 'प्लॅन' भाजपचा असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे. मात्र यासंदर्भात 'ना' शिंदे, 'ना' धस, 'ना' पक्षाचा कोणी नेता जाहीरपणे काहीही बोललेले नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com