माझा बाप, आजोबा नेता नाही... मीच नेता आहे

आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी केलेल्या टीकेला राम शिंदे यांनी उत्तर दिले.
Vidhan Parishad | BJP| Ram Shinde|
Vidhan Parishad | BJP| Ram Shinde|

Ram Shinde Vs Rohit Pawar : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील पानंद रस्ते कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपचे विधानपरिषद आमदार राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी केला होता. यावर कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी राम शिंदेंवर टीका केली होती. या टीकेला राम शिंदे यांनी उत्तर दिले. कर्जत तालुक्यातील गणेशवाडी येथील एका कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

राम शिंदे म्हणाले, मी आहे तेवढाच आहे. लोक हीच माझी संपत्ती आहे. त्यामुळे माझ्या मागे ईडी आणि सीबीआय लागत नाही. ईडी आणि सीबीआयने एवढ्या लोकांना त्रास दिला. मात्र ते मला त्रास देऊ शकले नाही, असा कोपरखळीही त्यांनी मारली.

Vidhan Parishad | BJP| Ram Shinde|
Video : राम शिंदे यांचे जल्लोषात स्वागत

ते पुढे म्हणाले की, मी आमदार झाल्यावर माझ्या नावावर एक गुंठाही वाढला नाही. माझ्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या नावाची जमीन माझ्या नावे झाली. जनाधार हीच माझी संपत्ती असल्याने पक्ष नेतृत्त्वाने माझा विचार केला. कोणत्याही मोठ्या पदाचा विषय निघाला की माझ्या नावाची चर्चा होते. आमदार झालोय लवकरच मोठे पद मिळाल्याशिवाय राहणार नाही. मी सांगतो ते होतं कारण माझा बाप, आजोबा नेता नाही. मीच नेता आहे. त्यामुळे त्यांनी मागितले तरी मंत्रिपद मिळाले नाही. मात्र मला दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यात निश्चित मंत्रिपद मिळेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

मंत्रिपद पहिल्या टप्प्यात हुकले. मात्र पुढे मिळेलचं. मला मिळाली 94 हजार मते मी वाया जाऊ दिली नाही. खोटे बोलून मतदान एकदाच होते. आपण देवाला नवस करतो. तो नवस पावला नाही तर माणूस म्हणतो दुसऱ्या देवाकडे चला तसं 2019ला नवस केला. मात्र झाले काहीच नाही, अशी नाव न घेता टीकाही त्यांनी केली.

Vidhan Parishad | BJP| Ram Shinde|
रोहित पवार- राम शिंदे लढतीत सुरेश धसांचे महत्व कायम!

मी विधानपरिषदेत पानंद रस्त्याचा प्रश्न उपस्थित केल्यावर रात्री-बेरात्री पानंद रस्त्याच्या खड्ड्यांत मुरुम टाकतात. जलयुक्तशिवार योजनेतून झालेल्या कामाची चौकशी करण्यात आली. मात्र राज्य सरकारने माझ्या कामांना क्लिनचिट दिली. मी दोषी आढळून आलो नाही. मी कोणत्याही चौकशीला घाबरलो नाही. चौकशीला थेट सामोरे गेलो. चौकशीत काहीही निष्पन्न झाले नाही, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला विलास गायकुडे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, तात्या माने, धनंजय मोरे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in