'वाघ म्हातारा झाला तरी शिकार करायची सोडत नाही'

भाजपचे ( BJP ) ज्येष्ठ नेते मधुकर पिचड ( Madhukar Pichad ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार डॉ. किरण लहामटे ( Dr. Kiran Lahamte ) यांचे नाव न घेता टीका केली.
Madhukar Pichad
Madhukar PichadSarkarnama

अकोले ( अहमदनगर ) : अकोले नगर पंचायतची निवडणूक सध्या सुरू आहे. या निवडणुकीसाठी भाजपने अकोले शहरात सभा घेतली. यात भाजपचे ( BJP ) ज्येष्ठ नेते मधुकर पिचड ( Madhukar Pichad ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार डॉ. किरण लहामटे ( Dr. Kiran Lahamte ) यांचे नाव न घेता टीका केली. 'Even though the tiger is old, it does not stop hunting'

गुजरी मार्केट येथे भाजप, आर.पी.आय युतीच्या प्रचार प्रारंभ माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या शुभहस्ते व सुभाष कोळपकर यांचे अध्यक्षतेखाली खाली झाला. यावेळी माजी मंत्री पिचड बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार वैभवराव पिचड, हेमलता पिचड, जिल्हा परिषद सदस्य कैलास वाकचौरे, जालिंदर वाकचौरे, ज्येष्ठ नेते शिवाजी धुमाळ, आर.पी.आय नेते विजय वाकचौरे, चंद्रकात सरोदे, शांताराम संगारे, जे.डी.आंबरे, भाजप तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, कल्पना सुरपुरिया, सुधाकर देशमुख, परशराम शेळके, शब्बीर शेख आदी उपस्थित होते.

Madhukar Pichad
वैभव पिचड म्हणाले, आम्ही चाळीस वर्षे विकासच केला...

मधुकर पिचड म्हणाले, वाघ म्हातारा झाला तरी शिकार करायची सोडत नाही. मी म्हातारा झालो तरी विरोधकांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. आपण 40 वर्षे तालुक्याचे विकासाचे काम केले. कुणाचे वाईट कधी केले नाही. कधीही गोरगरिबांचे रेशन चोरले नाही व चोरुही दिले नाही, असा टोला लगावत आमदारांनी तालुका जातीद्वेशाच्या दिशेने चालवला असल्याचा आरोप मधुकर पिचड यांनी केला.

पिचड पुढे म्हणाले की, आमदारांनी उच्चस्तरीय कालव्याचे म्हाळादेवी जलसेतूच्या एका पाईप हलविण्याच्या कामासाठी सर्वपक्षीय आंदोलन करुन व एक महिन्यात काम करुन पाणी देवू असा शब्द दिला होता. त्याला चार महिने होऊन गेले. अद्याप पाणी नाही. आपण भांगरे यांचे नाव भंडारदरा धरणाला द्यावा ही मागणी केली, कारण राघोजी भांगरे आपला आहे. विल्सन आपला बाप नाही. येत्या 18 डिसेंबरला केंद्रीय गृहमंत्री प्रवरानगरला येत आहेत. त्यांना भेटून निवेदन देवून धरणाला राघोजी भांगरेचे नाव देण्याची मागणी करणार आहे. तालुक्यात आमदार बदलता येईल मात्र अकोलेला वगळून गेलेला रेल्वेमार्ग बदलता येणार नाही. अकोलेच्या देवठाणहून जाणारा रेल्वेमार्ग साकूर मार्गे नेला जात आहे. हा आमदारांचा नाकर्तेपणाचा कळस असल्याचा दावा ही त्यांनी केला.

Madhukar Pichad
मला या वयात रस्त्यावर उतरायला भाग पाडू नका - मधुकरराव पिचड

वैभव पिचड म्हणाले, अकोले नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपने दिलेले सर्व उमेदवार उच्चशिक्षित, सुशिक्षित आहेत. कुणावरी कसलाही गुन्हा दाखल नाही. चारित्र्य संपन्न उमेदवार आहेत. पुन्हा तिच ती मंडळी दिली काहीत. काही जण निवडून आलेनंतर नगरपंचायत विकासाचा प्रश्न आला की वादा-वादी करतात. ते कोण आहेत, हे सगळ्यांना माहीत आहे. मागील पाच वर्षांत ग्रामपंचायतची नगरपंचायत झाल्यानंतर शहराचा खऱ्या अर्थाने विकासाला सुरवात झाली. शहारातील माळीझाप ते शेकीवाडीपर्यत सर्व प्रभागांत रस्ते, बंद गटारी, शौचालये आदी अनेक विकासकामे झालीत. आपण जिल्हा नियोजन समितीवर सोनाली नाईकवाडी यांना पाठवले. त्यांच्या माध्यमातूनही अनेक कामे शहरात झाली, असे वैभव पिचड यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com