'ईडी'विरोधातील आंदोलनातही काँग्रेस नेत्यांचा वाद मिटेना

'ईडी'ने काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी व ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी नोटीस दिली आहे.
Congress Latest Marathi News
Congress Latest Marathi NewsSarkarnama

महेश माळवे

श्रीरामपूर ( जि. अहमदनगर ) - अंमलबजावणी संचालनालयाने ( ED ) काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी व ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी नोटीस दिली आहे. या विरोधात देशभर काँग्रेसकडून निदर्शने होत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात काँग्रेसमधील दोन गटांत वाद आहेत. हे वाद ईडी विरोधी आंदोलनातही दिसून आले. ( Even in the agitation against ED, the dispute of the Congress leaders was not resolved )

खासदार राहुल गांधी व सोनिया गांधी यांना ईडीने पाठविलेल्या नोटिशीविरोधात काँग्रेसच्या वतीने आमदार लहू कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा सरचिटणीस अंकुशराव कानडे यांच्या नेतृत्वाखाली, तर (कै.) जयंत ससाणे गटाच्या वतीने माजी उपनगराध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर स्वतंत्र निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी दोन्ही गटांनी प्रांताधिकारी व तहसीलदार यांना निवेदने दिली.

Congress Latest Marathi News
अहमदनगर जिल्ह्यातून पेट्रोल-डिझेलला हद्दपार करा

श्रीरामपूर तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने, खासदार राहुल गांधी व सोनिया गांधी यांना पाठविलेल्या ईडी नोटिशीच्या निषेधार्थ आंदोलन झाले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष इंद्रनाथ थोरात, सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, माजी नगरसेवक अंजूम शेख, अशोक कानडे, राजेश अलघ, रवींद्र गुलाटी, मुक्तार शहा, कलीम कुरेशी, विजय शेळके, अॅड. समीन बागवान, अभिजित लिप्टे, कार्लस साठे, अमृत धुमाळ, वेणुनाथ कोतकर व काँग्रेसच्या सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी अंकुशराव कानडे, शेख, थोरात, मुरकुटे यांची भाषणे झाली. रमेश उंडे, अशोक बागूल, रज्जाक पठाण, रफिक शेख, सरपंच किशोर बनकर आदींसह विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Congress Latest Marathi News
'ईडी'चे बंद गेट पाहून नितीन राऊतांच्या अंगात 'ऊर्जे'चा संचार

(कै.) जयंत ससाणे गटाच्या वतीने माजी उपनगराध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले. जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष साईसंस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे, नीलेश भालेराव यांची भाषणे झाली. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी सभापती बाबासाहेब दिघे, माजी नगरसेवक शशांक रासकर, आशिष धनवटे, राजेंद्र आदिक, सुभाष तोरणे, राजेंद्र पाऊलबुद्धे, सुधीर नवले, रावसाहेब आल्हाट, सरबजितसिंग चुग, वैभव पंडित, मिथुन शेळके, रितेश एडके आदींसह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com