मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सहकार पॅनेलची स्थापना

राज्यात सक्षम असणार्‍या बॅंकांमध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक ही पहिल्या ३ मध्ये आहे.
मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सहकार पॅनेलची स्थापना
Jayant Patil

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Sangali Jilha Madhyavarti Bank) पंचवार्षिक निवडणुक २०२१-२०२६ करिता राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), कॉंग्रेस (Congress) व शिवसेना (Shivsena) यांच्या नेतृत्वाखाली सहकार विकास पॅनेलची स्थापना करण्यात आली आहे. सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज पॅनेलच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ जत, कवठेमहांकाळ, मिरज, तासगाव तालुक्यात प्रचार बैठकांना संबोधित केले.

गेल्या ५ वर्षांत खातेदारांच्या हितासाठी काळात बॅंकेने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. बॅंकेच्या पूर्वी असणाऱ्या २८०० कोटींच्या ठेवी होत्या, त्यात आता ६४०० कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. सुरुवातीला बॅंकेचा चार हजार कोटींचा टर्नओव्हर होता. त्यात वाढ होऊन तो आता १२५०० कोटींवर पोहोचला आहे. तर बँकेचा स्व. निधी ७०० कोटी रुपयांचा आहे.

Jayant Patil
एसटी संपाचे दोन आठवडे तरी तोडगा नाहीच; नेमकी कोण कोणाची कोंडी करतंय?

शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणे कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. तसेच ५ लाख रुपयांपर्यंत शुन्य टक्के व्याज दराने कर्ज देण्याचे धोरण आहे. शेतकऱ्यांच्या एकूण ५२ विद्यार्थी मुलांना एकुण ८ कोटी रुपयांचे शुन्य टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करून दिले आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या चुकीच्या निर्णयामुळे बॅंकेच्या १४ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा अद्यापही पडून आहेत.

राज्यात सक्षम असणार्‍या बॅंकांमध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक ही पहिल्या ३ मध्ये आहे. कर्मचार्‍यांना मागील ५ वर्षांत दोनवेळा पगार वाढ देणारी तसेच सोसायटीच्या सेक्रेटरींना २ पगार बक्षीस देणारी राज्यातील एकमेव बँक आहे. बँक चांगली प्रभावीपणे चालली पाहिजे याकरिता चांगले कार्यकर्ते बॅंकेत निवडून गेले पाहिजेत. सहकार विकास पॅनेलच्या सर्वच उमेदवारांना आपण सर्व जण साथ द्याल असा मला विश्वास आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in