आमच्यासाठी राजेंद्र पाटील यड्रावकरांचा शब्द प्रमाण

या निवडणुकीत संपूर्ण यड्रावकर गट सतेज पाटलांच्या पाठीशी उभा राहणार आहे.
आमच्यासाठी राजेंद्र पाटील यड्रावकरांचा शब्द प्रमाण
satej patilsarkarnama

शिरोळ (जि. कोल्हापूर) : आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर (Rajendra patil Yadravkar) यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा संपूर्ण यड्रावकर गट महाविकास आघाडीचे उमेदवार तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांनी सांगितले. (The entire Yadravkar group with the support of Satej Patil : Sanjay Patil-Yadravkar )

विधान परिषदेचे उमेदवारी सतेज पाटील यांनी जयसिंगपूर येथील यड्रावकर यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा स्वरूपा पाटील यड्रावकर, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, इचलकरंजीचे नगरसेवक मदन कारंडे, शिरोळ पंचायत समितीचे सभापती दीपाली परीट, आलास जिल्हा परिषद सदस्या परविन पटेल यांच्यासह यड्रावकर गटाचे जयसिंगपूर नगरपरिषद, शिरोळ नगरपरिषद, इचलकरंजी नगरपरिषद या सर्व नगरपरिषदांचे नगरसेवक-नगरसेविका यांची उपस्थिती होती.

satej patil
आमदार निकम, डॉ चोरगेंच्या विजयासह रत्नागिरी जिल्हा बॅंकेवर सहकारचे वर्चस्व; बाईत पितापुत्रांचा पराभव

यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी सांगितले की, या निवडणुकीत राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा शब्द हा आमच्या सर्वांसाठी प्रमाण आहे. आमची भूमिका ही महाविकास आघाडीच्या उमेदवार सतेज पाटील यांना पाठबळ देणारी आहे.

satej patil
क्रॉस व्होटिंगची धाकधूक आणि नेतेमंडळींचे मतदान केंद्रांवर दिवसभर ठाण!

सतेज पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्ये माझ्यासह ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर अशा तिघांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. मंत्रिपदाच्या माध्यमातून आम्ही कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. भविष्यातही आम्ही तीन मंत्री एकत्र राहून जिल्ह्याच्या विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही. आपला प्रतिनिधी म्हणून या पुढच्या काळात आपणा सर्वांना सोबत घेऊन काम करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, मदन कारंडे यांनी मनोगत व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in