गटबाजी संपवून लोकांमध्ये जा; अन्यथा पर्याय शोधू : रोहित पवारांचा राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना इशारा

पुढच्या बैठकीपर्यंत पंढरपूर राष्ट्रवादी काॅंग्रेसमधील गटतट संपलेले असतील, असा विश्वासही रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama

पंढरपूर : राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष (NCP) हा सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासावर उभा आहे. लोकांनी मोठ्या विश्वासाने सत्ता दिली आहे. तुम्हीच गटबाजी संपवून लोकांमध्ये गेला नाही, तर पक्षाला पर्याय शोधावा लागेल, असा इशाराच पंढरपुरातील (Pandharpur) राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिला आहे. पंढरपुरातील राष्ट्रवादी काॅंग्रेस अंतर्गत सुरु असलेल्या गटबाजीवर बोलताना आमदार पवार यांनी हा इशारा दिला आहे. पुढच्या बैठकीपर्यंत पंढरपूर राष्ट्रवादी काॅंग्रेसमधील गटतट संपलेले असतील, असा विश्वासही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. (End factionalism and go among the people; Otherwise find alternative : Rohit Pawar)

आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. ७ एप्रिल) राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यावेळी आमदार पवार यांनी तालुक्यातील नेत्यांना गटबाजी करु नका, असे आवाहन करत आगामी निवडणुकांमध्ये एकदिलाने आणि विश्वासाने काम करा, असा सल्लाही दिला. राज्यात महाविकास आघाडीचा नवा प्रयोग यशस्वी होत आहे, त्यामुळे विरोधी भाजप अस्वस्थ आहे. गेल्या दोन अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने सर्वसामान्य जनतेची आणि शेतकऱ्यांची अनेक कामे केली आहेत. परंतु ही कामे लोकांपर्यंत पोचवली जात नाहीत. यामध्ये आपण कमी पडत असल्याची कबुली देत, यापुढच्या काळात महाविकास आघाडी सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोचविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने भूमिका पार पाडावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Rohit Pawar
बारामती ॲग्रोला आदिनाथ २५ वर्षांसाठी भाडेतत्वावर कसा दिला, याची आम्हालाही कल्पना नाही!

विठ्ठल साखर कारखान्याकडे शेतकरी, कामगार आणि ऊस तोडणी वाहतूक ठेकेदारांची थकीत देणी आहेत. ती कशी देता येतील, यावर देखील विचार सुरु आहे. सरकारकडून काही मदत देता येईल का, याविषयीही चर्चा सुरु आहे. जो कोणी कारखाना चांगला चालवू शकेल, अशा लोकांना सोबत घेऊन कारखाना चालू करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही आमदार पवार यांनी या वेळी सांगितले.

Rohit Pawar
‘आदिनाथ’मधील चुकांची शिक्षा मिळाली...आमची आमदारकी, ZP अन्‌ पंचायत समितीही गेली!

दरम्यान, राष्ट्रवादीचे पंढरपूर शहराध्यक्ष सुधीर भोसले यांनी पंढरपुरातील गटबाजीविषयी नाराजी व्यक्त करत पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये शिस्त राहिली नसून बेशिस्त झाली असल्याचा थेट आरोप केला. कार्यकर्त्यांना पक्षशिस्तीचे धडे द्यावेत, अशी मागणीही या वेळी भोसले यांनी केली. या वेळी कल्याणराव काळे, युवराज पाटील, भगिरथ भालके, गणेश पाटील यांनी राष्ट्रवादीतील गटबाजीविषयी ब्र शब्दही न काढल्याने उपस्थितांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com