Kolhapur news: कर्मचारी म्हणतात पेन्शन द्या; बेरोजगार तरुण म्हणतात पेन्शन नको काम द्या..

बेरोजगारांचा मोर्चात शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटीलही सहभागी झाले होते.
Kolhapur news:
Kolhapur news: Sarkarnama

Kolhapur news: जुन्या पेन्शनसाठी राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. आज आंदोलनाचा चौथा दिवस असताना कोल्हापुरमध्ये मात्र वेगळेच चित्र दिसत आहे.आम्हाला पेन्शन नको पण आम्हाला काम द्या, या मागणीसाठी काही बेरोजगारांनी एकत्र येत एक मोर्चा काढला.त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात मोर्चा आणि प्रतिमोर्चाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे

सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी गेल्या चार दिवसांपासून संपावर आहेत. त्यांच्या या संपाविरोघात आता कोल्हापुरातील बेरोजगार तरुणांनी आंदोलन छेडलं आहे. जुनी पेन्शन थांबवा आणि महाराष्ट्र वाचवा, अशी भूमिका घेत त्यांनी हा मोर्चा काढला आहे. कोल्हापुरच्या ऐतिहासिक दसरा चौकातून हा मोर्चा काढण्यात आला. आम्हाला पेन्शन नको आम्ही अर्ध्या पगारावर काम करायला तयार आहे, पण आम्हाला काम द्यावं, अशी मागणी या बेरोजगार तरुणांकडून करण्यात आली आहे.

Kolhapur news:
BJP News : चित्रा वाघांच्या अडचणी वाढल्या ; न्यायालयाचा दणका, राष्ट्रवादीच्या नेत्याने..

विशेष म्हणजे या शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील हेही या मोर्चात सहभागी झाले होते. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर भाष्य करत टीकाही केली. कोल्हापुरातील दसरा चौकात बेरोजगारांचे आंदोलन झाले. तर दुसरीकडे टाऊन हॉल परिसरात सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे आंदोलन बेकायदेशीर म्हणणाऱ्या आंदोलक कर्मचाऱ्यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पुतळ्याला चपलांचा प्रसाद दिला. तर थाळी नाद करत पेन्शन नाकारणाऱ्या राज्यकर्त्यांचा निषेध नोंदवण्यात आला.

गेली चार दिवसापासून कोल्हापुरात आज (१७ मार्च) बेरोजगारांचा मोर्चा निघणार असल्याची पोस्ट विविध माध्यमांवर फिरत होती.मात्र या मोर्चाचे नेतृत्व करणारा समोर न आल्यामुळे हा मोर्चा काही तरुणांच्या नेतृत्त्वात हा मोर्चा काढण्यात आला.पोलिसांची रीतसर परवानगी घेऊन जुन्या पेन्शन विरोधात आणि तरुणांना रोजगार मिळावा या मागणीसाठी बेरोजगार तरुण मोर्चा काढण्यात आला. जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तर दुसरीकडे आम्हाला नोकरी द्या,आम्ही अर्ध्या पगारात काम करायला तयार आहोत, या मागणीसाठी बेरोजगारांनी काढलेला प्रति मोर्चा हा पश्चिम महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com