Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी आक्रमक; कोल्हापुरात पाटलांनी काढला धडकी भरवणारा मोर्चा

Satej Patil News : कोल्हापुरात 14 तारखेला काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे.
Old Pension Scheme News
Old Pension Scheme NewsSarkarnama

Old Pension Scheme News : शासकीय कर्मचाऱ्यांनी 'एकच मिशन-जुनी पेन्शन' हे दाखवून देण्यासाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या नेतृत्वात आज कोल्हापुरात (Kolhapur) मोर्चा काढण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी सकारात्मक शब्द काढून टाकून जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी पाटील यांनी केली. (Old Pension Scheme Movement)

आता पेटवलेला वणवा थांबवून चालणार नाही, आहे तशी जुनी पेन्शन मिळाली, तरच माघार, असे पाटील म्हणाले. जुन्या पेन्शन योजने संदर्भात चार राज्यांनी निर्णय घेतला आहे, तर मग महाराष्ट्र राज्याने घ्यावा. या मातीने संघर्ष केला तो महाराष्ट्राने पाहिला. येथील संदेश संपूर्ण महाराष्ट्रात जाईल. एकसंधपणा ठेवा, दुधाच्या भांड्यात मीठ टाकण्याची संधी कोणालाही देऊ नका. आम्ही 100 टक्के तुमच्या पाठिशी आहोत. कितीही किंमत मोजायला लागू दे भोगायला तयार आहोत, असे पाटील म्हणाले.

Old Pension Scheme News
Chinchwad by-election : चिंचवड जिंकूनही भाजपला चिंता; कारण काय?

या वेळी पाटील यांनी अदानी समूहात करण्यात आलेल्या गुंतवणुकीवरुन हल्ला चढवला. एलआयसीने अदानीला 34 हजार कोटी दिले तेव्हा आकडेवारी आठवली नाही का, असा सवाल त्यांनी केला. एनपीएमधील 12 लाख कोटींची कर्ज केंद्र सरकारने माफ केली आहेत. याबाबत आरटीआयमधून माहिती मागवली, स्टेट बॅंक ऑफ इंडियाने माहिती देण्यास नकार दिला. मग कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्यास का थांबता? बुलेट ट्रेनमधून राज्याला किती पैसा मिळणार हे राज्य सरकारने सांगितले नाही, असा हल्लाबोल पाटील यांनी केला.

Satej Patil
Satej PatilSarkarnama

जाहिरातींवर 200 कोटी खर्च सुरु आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सुरु आहे. विधीमंडळात आम्ही मुद्दा उपस्थित केल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सकारात्मक असल्याचे सांगितले. तसेच चर्चेला बोलावणार असल्याचेही सांगितले. मात्र, चर्चेला बोलवू नका, चॉकलेट वाटली जातील. राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांचा प्रश्न असतानाही भूमिका का घेत नाही?, असा सवाल पाटील यांनी केला.

Old Pension Scheme Movement
Old Pension Scheme MovementSarkarnama

"या मोर्चामध्ये 35 शिक्षक संघटना आणि 50 मध्यवर्ती संघटना सहभागी झाल्या होत्या. सरकारी कर्मचाऱ्यांचा हा मोर्चा आहे. जुन्या पेन्शनचा मुद्दा 15 वर्षापासून फक्त चर्चेतच आहे. प्रत्येकवेळी आर्थिक कारणच सांगितले जाते. नव्या पेन्शनच्या भूमिकेवरुन अन्याय होत आहे. देशात सात टक्के महागाई असताना परतावा मात्र 2 टक्केच दिला जातो. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांनी उणिवा भोगल्या आहे, अशा शब्दांत पाटील यांनी राज्य सरकावर टीका केली.

Old Pension Scheme News
Chandrakant Patil News : 'Who is Who Is Dhangekar' चंद्रकांतदादांची पाठ सोडेना; आता कोल्हापुरातही बॅनर

कोल्हापुरात 14 तारखेला काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. कोल्हापुरातील एकही शासकीय कार्यालय चालू राहता कामा नये. ताकदीने सहभागी होऊ या. सकारात्मक शब्द काढून टाका, जुनी पेन्शन लागू करा, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. प्रशासन व शासन ही विकासाची दोन चाके आहेत. शासनाने केलेले कायदे पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. विकासात तुमचा वाटा मोठा आहे. त्यामध्ये एक चाक समाधानी नसेल, तर पुढील 25 वर्ष तत्परतेने काम होणार नाही. नवीन पेन्शन योनजना अमान्य आहे. चार राज्यांनी निर्णय घेतला, त्यांचे उत्पनही कमी आहे. सर्वाधिक उत्पन देणारे राज्य आपले आहे. जुन्या पेन्शन मुळे राज्य दिवाळखोरीत जाणार हे पटत नाही. सातत्याने आकडेवारी सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करुन नये, असेही पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com