OBC आरक्षणाशिवाय निवडणुका होवू नयेत; धनंजय मुंडेंची आग्रही मागणी

राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांबाबत माजी मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांनी ट्विट करत मत व्यक्त केले.
Dhananjay Munde
Dhananjay Munde sarkarnama

परळी वैजनाथ : राज्यातील 92 नगरपरिषद व 4 नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. मात्र राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर कोणताही निर्णय येण्याआधीच ही निवडणूक होत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांनी ट्विट करत मत व्यक्त केले. ( Elections should not be held until the reservation of OBCs is declared )

धनंजय मुंडे यांनी म्हंटले आहे की, राज्य निवडणूक आयोगाने नुकत्याच राज्यातील 92 नगर परिषद व 4 नगर पंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पण या निवडणुका ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर निर्णय झाल्याशिवाय होऊ नयेत, अशी आमची ठाम भूमिका असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हंटले आहे.

Dhananjay Munde
सत्ता गेली अन् धनंजय मुंडे रमले चहाच्या टपरीवर...

त्यांनी पुढे म्हंटले आहे की, ओबीसी आरक्षण संदर्भात महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या आयोगाचा अहवाल तयार आहे व त्यामुळे नवीन सरकारने तातडीने योग्य ती कार्यवाही पूर्ण केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

इंपेरिकल डेटाच्या टोलवा टोलवी वरून ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले, त्यावर धनंजय मुंडे यांनी वेळोवेळी आपली भूमिका व्यक्त केलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ओबीसींचे राजकीय आरक्षण बहाल झाल्याशिवाय निवडणुका झाल्या तर ओबीसी समाजातील स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यावर तो एक प्रकारचा अन्याय ठरेल, असे मत यापूर्वीही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले होते.

Dhananjay Munde
धनंजय मुंडे नैराश्याच्या गर्तेत, तणावामुळे ब्रेन स्ट्रोक ; आरोपपत्रात धक्कादायक खुलासे

दरम्यान नवीन सरकारने राज्यात सत्तारूढ होताच ओबीसी आरक्षणाच्या विषयावरून बैठका घेऊन एक प्रकारची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न केला होता. मात्र निवडणूक आयोगाने आरक्षणाचा तिढा सुटलेला नसताना नगर परिषद व नगर पंचायत निवडणुका घोषित केल्याने, विविध स्तरातून नाराजी व्यक्त होत आहे, त्यातच माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील ओबीसींचे राजकीय आरक्षण जाहीर झाल्याशिवाय राज्यात निवडणुका होऊ नयेत, ही आपली ठाम भूमिका असल्याचे म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com