राज्यातील सहकारी संस्थाच्या निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजणार

यामध्ये 19 हजारांवर संस्थांचा समावेश असणार आहे.
Co-operative Society Election
Co-operative Society Electionsarkarnama

सोलापूर : कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यभरात सहकारी संस्थांच्या (Co-operative Society Election) निवडणुका रखडल्या आहेत. राज्यभरातील तब्बल 67 हजारांहून अधिक सहकारी संस्थांपैकी 17 हजार 847 संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला गती देण्यात येत असून जून 2022 पर्यंत हे काम रुळावर आणण्यात येईल, अशी माहिती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील (Jagdeep Patil) यांनी दिली.

डॉ. पाटील आज (ता. ३ नोव्हेंबर) सोलापूर दौऱ्यावर होते. पाटील म्हणाले, कोरोनामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका घेणे अशक्‍य होते. राज्यात अशा 67 हजार संस्थांच्या निवडणुका घेऊन हे काम जून 2022 पर्यंत संपविण्याची योजना आहे. त्यानंतरच्या काळात मुदत संपणाऱ्या संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम नियमीत होईल, याबाबत तयारी झाली आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील 22 हजारांवर संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरवात झाल्याचेही त्यांनी सांगितले. तिसरा टप्प्यातील निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजेल. यामध्ये 19 हजारांवर संस्थांचा समावेश असणार आहे, अशी माहीत त्यांनी दिली.

Co-operative Society Election
देशमुखांची 100 कोटीची वसुली : परमबीरसिंगांचा आरोप ठरणार फुसका बार?

यंत्रणा मर्यादित असल्याने निवडणुका घेण्यासाठी अडचणी येत आहेत. मात्र, सहकार निवडणूक प्राधिकरणाला आयोगाप्रमाणे अधिकार आहेत. राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सरकारी महामंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची सेवा आपल्याला घेता येते. तसेच वाहनांचेही अधिग्रहण करता येते. राज्यातील 1500 कर्मचाऱ्यांची यासाठी गरज पडणार आहे. त्यादृष्टीनेही काम सुरु आहे. आणखी मनुष्यबळाची गरज पडल्यास निवृत्त कर्मचाऱ्यांची नेमणूक करता येते. देशात महाराष्ट्रातच सहकारी संस्थांचे जाळे मोठ्या प्रमाणात विणले गेलेले, असल्याचे सांगून पाटील यांनी सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर विवेचन केले.

Co-operative Society Election
आर्यनला अटक होताच राहुल गांधींनी शाहरूख खानला पाठवलेलं पत्र आलं समोर

राज्यभरातील जवळपास 241 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्याही निवडणुका घ्यावयाच्या आहेत. नवी मुंबई, नागपूर येथील बाजार समितीच्या निवडणुका न्यायालयाच्या आदेशानुसार झाल्या आहेत. अन्य बाजार समित्यांच्या निवडणुकासाठीची तयारी सुरु आहे. शासनाचा आदेश आल्याने सोलापूरसह राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक वगळता राज्यातील अकरा जिल्हा सहकारी बॅंकांच्या निवडणुकीची तयारी सध्या सुरु आहे. या निवडणुका लवकरच होती, असेही पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com