सोलापूर विद्यापीठातील सिनेट, विद्या परिषद, अभ्यास मंडळांसाठी निवडणूक जाहीर; २९ सप्टेंबरला मतदान

अधिसभेच्या प्राचार्य मतदारसंघातून १० सदस्य, संस्था प्रतिनिधीसाठी ६ , शिक्षकांसाठी १०, पदवीधर मतदारमधून १०, तर विद्यापीठ शिक्षकमधून तीन सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यासाठीचे आरक्षण विद्यापीठाकडून यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे.
 Solapur University
Solapur UniversitySarkarnama

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर (Solapur) विद्यापीठाच्या (University) अधिसभा (सिनेट), विद्या परिषद आणि अभ्यास मंडळे या अधिकार मंडळांच्या निवडणुकांचा (Election) कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. येत्या २९ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रभारी कुलसचिव सीए श्रेणिक शाह यांनी दिली. (Elections announced for Senate, Vidya Parishad, Study Boards in Solapur University)

अधिसभेच्या प्राचार्य मतदारसंघातून १० सदस्य, संस्था प्रतिनिधीसाठी ६ , शिक्षकांसाठी १०, पदवीधर मतदारमधून १०, तर विद्यापीठ शिक्षकमधून तीन सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यासाठीचे आरक्षण विद्यापीठाकडून यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. विद्या परिषदेसाठी प्रत्येक विद्या शाखेचे दोन शिक्षक निवडून येणार आहेत. एकूण चार विद्याशाखा आहेत. त्यानुसार सदस्य निवडणुकीद्वारे निवडले जाणार आहेत. त्याचबरोबर अभ्यास मंडळासाठी ही निवडणूक होणार आहे. प्रत्येक अभ्यास मंडळावर तीन महाविद्यालयीन अथवा मान्यताप्राप्त संस्थेचे विभागप्रमुख निवडले जाणार आहेत.

 Solapur University
‘ते’ चित्र हटवून पक्षनिष्ठा देखावा लावा; सेनेतील बंडखोरीवर भाष्य करणारा देखावा लावण्यास कोर्टाची परवानगी

या तीनही अधिकार मंडळाच्या निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार आता १२ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. येत्या १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येणार आहे. उमेदवारी अर्जांवर १७ सप्टेंबर रोजी कुलगुरूंकडे अपील करता येणार आहे. पात्र उमेदवारांच्या नावाची यादी रविवारी (ता. १८ सप्टेंबर) निवडणूक पोर्टलवर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानुसार २९ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चारपर्यंत शहर व जिल्ह्यातील १६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणी ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत होणार आहे.

 Solapur University
भाजपमध्ये निष्ठावंत्यांची उपेक्षा, पक्षांतर करून आलेल्यांचा सन्मान; तालुकाध्यक्षांची खंत

सर्व अधिकार मंडळाची निवडणूक नोटीस विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरताना उमेदवाराने निवडणूक नोटीसमध्ये नमूद केलेल्या आरक्षणाबाबतच्या, शैक्षणिक अहर्ताबाबतच्या व अनुभवबाबतच्या प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे. ता. नऊ, १० आणि ११ सप्टेंबर या सुटीच्या दिवशी उमेदवारांच्या सोयीसाठी विद्यापीठातील सभा व निवडणूक विभाग, वित्त व लेखा विभाग आणि आवक विभाग सुरू राहणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रेणिक शाह यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com