नगर जिल्ह्यात निवडणुकांचे वाजले बिगूल : चार नगरपंचायती व महापालिकेच्या एका प्रभागासाठी रणधुमाळी सुरू

अहमदनगर ( Ahmednagar ) विधानपरिषद मतदार संघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्यावरच विधानपरिषदेच्या जागेची निवडणूक होणार हे स्पष्ट होते.
नगर जिल्ह्यात निवडणुकांचे वाजले बिगूल : चार नगरपंचायती व महापालिकेच्या एका प्रभागासाठी रणधुमाळी सुरू
निवडणुका सरकारनामा

अहमदनगर : अहमदनगर विधानपरिषद मतदार संघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्यावरच विधानपरिषदेच्या जागेची निवडणूक होणार हे स्पष्ट होते. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने काल ( बुधवारी ) सायंकाळी अकोले, कर्जत, पारनेर, शिर्डी या नगरपंचायतींची सार्वत्रिक तर अहमदनगर महापालिकेतील श्रीपाद छिंदमच्या जागेची पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. Election time in Nagar district: Four Nagar Panchayats and one Municipal Corporation ward

या सार्वत्रिक निवडणुकांचे व महापालिकेच्या पोटनिवडणुकीचे मतदान 21 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे आगामी 25 दिवस जिल्ह्यात मोठ्या राजकीय धुमाकुळीचे ठरणार आहेत. या निवडणुकांत विखे कुटूंबीयांच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

निवडणुका
सर्व निवडणुका भाजपमार्फतच लढणार : विखे पाटलांची घोषणा

राज्यातील 105 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामध्ये नगर जिल्ह्यातील अकोले, कर्जत, पारनेर, शिर्डी नगरपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुकांसाठी 21 डिसेंबरला मतदान व 22 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. संबंधित क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली असल्याची घोषणा निवडणूक आयुक्तांनी केली आहे. एप्रिल 2020 ते मे 2021 दरम्यान मुदत संपणाऱ्या नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. एक ते सात डिसेंबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करणे, तर 8 डिसेंबरला अर्जांची छाननी होईल. राखीव जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना अर्जासोबत जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. तसेच कोरोना विषयक नियमांची अंमलबजावणी करून उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

निवडणुका
तोंडावर निवडणुका, अहंकाराची किंमत चुकवावी लागेल; म्हणून मोदी नमले…

श्रीपाद छिंदमच्या जागेसाठी पोटनिवडणूक

अहमदनगर महापालिकेतील वादग्रस्त ठरलेले माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचे नगरसेवकपद राज्य सरकारने रद्द ठरविले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याने छिंदमवर ही कारवाई करण्यात आली होती. त्या जागेसाठी पोटनिवडणूक लागली आहे. छिंदम प्रभाग 9 क मधून निवडून आला होता. या प्रभागात 18 हजार 394 मतदार व 24 मतदान केंद्रे आहेत. इच्छुकांना 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 7 डिसेंबरला उमेदवारांची अर्ज छानणी होईल. 9 डिसेंबरला अर्ज माघारी घेता येणार आहे. 10 डिसेंबरला चिन्ह वाटप होईल. 21 डिसेंबरला मतदान तर 22 डिसेंबरला मतमोजणी प्रक्रिया होणार आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in