सूत गिरणीची निवडणूक ठरवणार सांगोला मतदार संघाचे भवितव्य

Sangola News : सूत गिरणीच्या निवडणुकीत शेकापचे दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांच्या राजकीय वारसदारांचे भवितव्य ठरणार आहे
Sangola Yarn Mill News
Sangola Yarn Mill Newssarkarnama

Sangola News : शेकापचे दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांच्या पश्चात पहिल्यांदाच सांगोला (Sangola) शेतकरी सहकारी सूतगिरणीची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार की प्रत्यक्ष लढती होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून सांगोला मतदार संघाचेही भवितव्य ठरणार आहे.

१७ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत दिवंगत गणपतराव देशमुख यांचे पुत्र चंद्रकांत देशमुख, नातू डॉ. अनिकेत देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे कौशल्य पणाला लागणार आहे. सांगोल्याचे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार शहाजीबापू पाटील, राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे, काँग्रेसचे नेते प्रा. पी. सी. झपके यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेकापचे भवितव्य याच निवडणुकीवर अवलंबून असल्याचे सांगितले जात आहे.

Sangola Yarn Mill News
बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून पळवापळवीच्या धाकाने युवा सेनेकडून नियुक्त्यांवर भर !

गणपतराव देशमुख यांनी १९८० मध्ये सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणीची उभारणी (Local Body Election) केली होती. सूतगिरणीकडून चीन, इजिप्त, मलेशिया, बांगलादेश आदी देशांना सूत निर्यात होते. राज्यात एका पाठोपाठ एक सूतगिरण्या बंद झाल्या आहेत. मात्र, सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणी केवळ व्यवस्थापन आणि सचोटीच्या कारभारामुळे चांगल्या प्रकारे चालू आहे. मात्र, गणपतराव देशमुख यांच्या पश्चात या सूतगिरणीचा गाडा पुढे नेणे हे त्यांच्या राजकीय वारसदारांपुढील मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणीची निवडणूक कसोटीची ठरणार आहे.

गणपतराव देशमुख यांनी योग्य कार्यकर्त्यांकडे संस्थांची जबाबदारी सोपविली होती. सांगोला सूतगिरणीची जबाबदारी सुरुवातीच्या काळात दिवंगत नेते ॲड. वसंतराव पाटील यांच्याकडे होती. त्यांच्यानंतर अलिकडे सलग १५ वर्षे नानासाहेब लिगाडे यांनी या सूतगिरणीचा कारभार पाहिला आहे.

लिगाडे यांनी शिक्षकी पेशा सोडून सूतगिरणीची जबाबदारी स्वीकारली होती. असे अनुभवी, कार्यकुशल नानासाहेब लिगाडे यांनी आता सूतगिरणीच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे, त्यामुळे या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळा सोबतच मतदार संघातील नागरिकांच्याही नजरा लागल्या आहेत. लिगाडे यांच्यासह इतर काही दिग्गज मंडळीही या निवडणुकीपासून दूर आहेत. यात बाबूराव गायकवाड, शहाजी नलवडे, शिवाजी मिसाळ, विशालदीप बाबर, गोविंद जाधव, अंकुश येडगे आदींचा समावेश आहे.

Sangola Yarn Mill News
उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र दौरा जाहीर करताच, एकनाथ शिंदेंनी उचलले 'हे' पाऊल

यामुळे गणपतराव देशमुख यांच्या राजकीय वारसदारांचा सूतगिरणी ताब्यात ठेवताना राजकीय कस लागणार आहे. निवडणुकीत शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) आणि दीपक साळुंखे आदींचे महत्त्व वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. २७ आॕक्टोबर दुपारी ३ वाजे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. सूतगिरणीचे एकूण सभासद मतदार ११ हजार ५६० एवढे आहेत. त्यामध्ये कापूस उत्पादक शेतकरी मतदार सात हजार ०९३ तर बिगर कापूस उत्पादक शेतकरी मतदार ४ हजार ४६७ आहेत. संस्था प्रतिनिधी मतदारांची संख्या ८१ एवढी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com