Pandharpur : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र कोंढरे यांची निवड

Rajendra Kondhare : ''तीन लाख कुटुंबापर्यंत संपर्क साधून महासंघाची संघटनात्मक बांधणी करणार..''
Rajendra Kondhare
Rajendra Kondhare Sarkarnama

पंढरपूर : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र कोंढरे यांची एक मताने निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष पदी नरेंद्र अण्णासाहेब पाटील (अध्यक्ष अण्णासाहेब पाटील महामंडळ) सरचिटणीसपदी प्रकाश वसंतराव देशमुख, कोषाध्यक्षपदी प्रमोद बळवंत जाधव, वि.चिटणीसपदी अतिश गायकवाड यांची निवड झाली आहे.

निवड निर्णय अधिकारी अँड. प्रविण गोगावले यांनी निवड झालेल्यांची नावे वाचून दाखविली. तसेच त्या नावाला राज्यांच्या मराठा महासंघाच्या सर्व साधारण सभेने मंजुरी दिली.

Rajendra Kondhare
Bageshwar Maharaj : संत तुकाराम महाराजांचा अपमान केलेल्या धर्मेंद्र शास्त्रींवर वारकरी संतापले

सदर निवडणूक प्रक्रियेला काही व्यक्तीनी मुंबई सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले होते. मात्र, त्यास स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यानंर आज (दि.२९) पंढरपूर येथे सर्वसाधारण सभा पडली. या सभेला राज्याच्या सर्व भागातून मोठ्या संख्येने सभासद व पदाधिकारी उपस्थित होते.

Rajendra Kondhare
Eknath Shinde News : महाराष्ट्र ही संतांची भूमी, संत समाजाला दिशा देण्याचे काम करतात..

दरम्यान, ''तीन लाख कुटुंबापर्यंत संपर्क साधून महासंघाची संघटनात्मक बांधणी करून महासंघ यापुढे मराठा समाजाचे आर्थिक प्रश्न, सामाजिक सलोखा, उद्योग, व्यवसाय, शिक्षण व कृषी याविषयावर मोठ्या प्रमाणावर काम करणार आहे'', असे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com