निवडणूक कठीण, तुझं काय खरं नाही.., अशा वावड्या उठूनही अनिल देसाई बॅँकेवर बिनविरोध

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर Ramraje Nimbalkar, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील Balasaheb Patil, बँकेचे विद्यमान अध्यक्ष आमदार शिवेंद्रराजे भोसले Shivendraraje Bhosale, आमदार मकरंद पाटील Makrand patil, आमदार शशिकांत शिंदे shashikant shinde यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून मला पॅनेल मध्ये घेतले.
निवडणूक कठीण, तुझं काय खरं नाही.., अशा वावड्या उठूनही अनिल देसाई बॅँकेवर बिनविरोध
Anil Desai, Ramraje Naik Nimbalkarrupesh kadam

दहिवडी : ''मला यावेळी निवडणूक कठीण आहे. माझं काही खरं नाही,'' अशा वावड्या उठत होत्या. पण, मला माझ्या विजयाची पूर्ण खात्री होती. सातारा जिल्हा बँकेची निवडणूक चौथ्यांदा जिंकलो असून त्यातील दोनदा बिनविरोध निवडून आलोय. मला बिनविरोध निवडून देणाऱ्या सर्वांचा मी आभारी आहे. यापुढील काळात माण तालुक्यातील सर्व निवडणूका ताकदीने लढणार आहे, असे मत जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई यांनी व्यक्त केले आहे.

सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक म्हणून बिनविरोध निवडून आल्यानंतर अनिल देसाई यांचे दहिवडी येथे फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अनिल देसाई म्हणाले, अनेकजण वेगवेगळ्या वावड्या उठवत होते. मला यावेळी निवडणूक कठीण आहे. माझं काही खरं नाही. पण मला माझ्या विजयाची पूर्ण खात्री होती. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, बँकेचे विद्यमान अध्यक्ष आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून मला पॅनेलमध्ये घेतले.

Anil Desai, Ramraje Naik Nimbalkar
उदयनराजेंचे टेन्शन गेले, शिवेंद्रसिंहराजेंसह सातारा जिल्हा बँकेवर बिनविरोध

मागील निवडणुकीत माझ्या विरोधात १३ अर्ज भरण्यात आले होते. यावेळी ती संख्या आठवर आली. सर्व परिस्थिती पाहून तसेच विनंतीला मान देवून माझ्या विरोधातील सर्वांनी अर्ज काढून घेतले. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा मला बिनविरोध संचालक होता आले. अनिल देसाई म्हणाले, यापुढील काळात जो पक्ष लोकांचे काम करेल, त्यांचा झेंडा हाती घेणार आहे. पण तोपर्यंत माणमधील म्हसवड नगरपालिका, दहिवडी नगरपंचायत तसेच सर्व जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण हे समविचारींना सोबत घेवून पूर्ण ताकदीने लढणार आहे.

Anil Desai, Ramraje Naik Nimbalkar
माण बाजार समितीवर आमदार जयकुमार गोरे यांचे एकहाती वर्चस्व      

माझा पराभवाचा काळ संपला असून यापुढील प्रत्येक निवडणुकीत निष्ठावंत सहकाऱ्यांच्या ताकदीवर विजयश्री खेचून आणणार आहे. यावेळी माण तालुका पत्रकार संघाच्यावतीने अनिल देसाई यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मजूर फेडरेशनचे संचालक पिंटू जगदाळे, रफिक मुलाणी, दादासाहेब शिंदे, आण्णा मगर, दाजीराम पवार, समीर ओंबासे आदी मान्यवर उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.