सोलापूरसह सहा जिल्हा बॅंकांच्या निवडणुकीचा निर्णय लवकरच : सहकारमंत्र्यांचे संकेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन या बॅंकांची निवडणूक घेण्यासंदर्भात येत्या आठवडाभरात घेतला जाईल, असे सहकार मंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट केले.
Solapur DCC bank
Solapur DCC bankSarkarnama

सोलापूर : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळात पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर यासह अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या (District Bank) संचालक मंडळ निवडणुकीचा धुराळा उडाला होता. सोलापूर व नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची सुरू झालेली निवडणूक प्रक्रिया महाविकास आघाडी सरकारने बॅंकांचे आर्थिक कारण देत स्थगित केली होती. प्रशासक/प्रशासकीय मंडळ असलेल्या सोलापूर, बीड, नागपूर, नाशिक, बुलढाणा व वर्धा या सहा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या निवडणुका (Election) घेण्याच्या हालचाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारने सुरू केल्या आहेत. (Election decision of six district banks including Solapur soon : Cooperative Minister's signal)

राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे (MLA Atul Save) यांनी नुकताच बीड जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी सोलापूर, बीडसह राज्यात प्रशासक/प्रशासकीय मंडळ असलेल्या हा डीसीसी बॅंकांच्या बाबतीत या आठवड्यात निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालिन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या काळात सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरुवातीला तत्कालिन जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी, तर सध्या राज्याचे अप्पर निबंधक शैलेश कोतमिरे हे प्रशासक म्हणून काम पहात आहेत.

Solapur DCC bank
‘उद्धव ठाकरेंकडून ही अपेक्षा नव्हती; आम्ही दुखावलो गेलोय’

मला प्रशासक पदातून मुक्त करा, अशी मागणी अप्पर निबंधक तथा सोलापूर डीसीसीचे प्रशासक कोतमिरे यांनी सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याकडे केली आहे. सहकार आयुक्तांनी या संदर्भातील निर्णय अद्यापपर्यंत दिलेला नाही. प्रशासक कोतमिरे यांची मुदत डिसेंबरपर्यंत आहे. राज्यातील २८३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची कार्यवाही राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सुरू केली आहे. त्यातच आता सहा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होण्याची शक्‍यता आहे. नगरपरिषद, जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांपूर्वी सहकारी व पणन संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात.

Solapur DCC bank
उद्धवसाहेबांसाठी येरवड्यातील एक बेड आरक्षित ठेवा : ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावर शिंदे गट आक्रमक!

दिग्गज माजी संचालकांची विकेट जाणार

सोलापूर जिल्ह्यात १ हजार २७९ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था (सोसायट्या) आहेत. त्यापैकी मार्च २०२२ पर्यंत १ हजार०७८ सोसायट्या निवडणुकीला पात्र होत्या. जिल्ह्यातील १ हजार ०७५ सोसायट्यांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सुमारे ४१ सोसायट्यांवर सध्या प्रशासक आहे. १६० सोसायट्यांपैकी काही सोसायट्यांची मुदत बाकी आहे, तर काही सोसायट्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. मतदानासाठी आवश्‍यक असलेल्या निकषांत किती सोसायट्या बसतात, सोसायटी मतदार संघातून संचालक होण्यासाठी असलेल्या निकषात किती संस्था बसतात? यामध्ये अनेक दिग्गज माजी संचालकांची विकेट उडण्याची शक्‍यता आहे.

Solapur DCC bank
उद्धवजी, ‘ते’ शब्द परत घ्या : देवेंद्र फडणवीसांचे ठाकरेंना आवाहन

आठवड्याभरात निर्णय घेणार

राज्यातील सोलापूर, नाशिक, नागपूर, बीड, वर्धा, बुलढाणा या सहा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांवर प्रशासक/प्रशासकीय मंडळ कार्यरत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन या बॅंकांची निवडणूक घेण्यासंदर्भात येत्या आठवडाभरात घेतला जाईल, असे सहकार मंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com