Satara : एकनाथ शिंदेंचे आदित्य ठाकरेंना उत्तर... जनता त्यांना योग्यवेळी जागा दाखवेल...

मुख्यमंत्री शिंदे Eknath Shinde म्हणाले, नवीन प्रकल्प New Project येत आहेत. पंतप्रधान नरेंद मोदी PM Narendra Modi , गृहमंत्री अमित शहा Amit Shaha यांच्याशी आम्ही सातत्याने संपर्क ठेऊन आहोत.
Eknath Shinde, Aditya Thackeray
Eknath Shinde, Aditya Thackeraysarkarnama

सातारा : हे सर्वसामान्यांचे सरकार असून आम्हाला सर्वसामान्य व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. आम्ही विरोधकांच्या टीकेला कामाने उत्तर देऊ. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, ती योग्य वेळी प्रत्येकाला जागा दाखवत असते. जनतेला विश्वास आहे की हे काम करणारे सरकार आहे. त्यामुळे आम्ही काम करत राहू आणि त्यांना टीका करत राहू देत, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी आदित्य ठाकरेंसह Aditya Thackeray विरोधांना लगावला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या त्यांच्या दरे तर्फ तांब या गावी दोन दिवस मुक्कामी आहेत.रात्री साडे सात वाजता त्यांनी ग्रामदैवत उत्तरेश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना देवाकडे काय मागणी केली असे विचारले असता ते म्हणाले, राज्यातील जनतेला सुख समाधान मिळू देत. तसेच राज्याची भरभराट होऊन वेगाने विकास होऊ देत, अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याबाबत त्यांना विचारले असता मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, नवीन प्रकल्प येत आहेत. पंतप्रधान नरेंद मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याशी आम्ही सातत्याने संपर्क ठेऊन आहोत. राज्याच्या विकासाबद्दल आम्ही त्यांच्या संपर्कात असतो. आगामी काळात मोठे प्रकल्प महाराष्ट्रात येतील. जे महाराष्ट्रातून प्रकल्प गेलेत त्याबद्दल जे आरोप होत आहेत. त्याला जबाबदार कोण हे उपमुख्यमंत्री व उद्योग मंत्री यांनी स्पष्ट केले आहे.

Eknath Shinde, Aditya Thackeray
Satara : सहा महिन्यांनी मुख्यमंत्री दरे गावात; काय घोषणा करणार याची उत्सुकता...

या मुद्द्यावरून मला कुठले ही राजकारण करायचे नाही. या राज्याची भरभराट होऊन तरूणांच्या हाताला काम मिळावे. त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम करण्यासाठी राज्यात नवीन उद्योग आणण्याचे काम आमचे सरकार करणार आहे. विविध प्रकल्प बाहेर गेल्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी केलेल्या आरोपाबाबत विचारले असता मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, त्यांच्या आरोपाला मला उत्तर द्यायचे नाही. हे सर्वसामान्यांचे सरकार असून सर्वसामान्य, शेतकऱ्यांचे प्रश्न आम्हाला सोडवायचे आहेत.

Eknath Shinde, Aditya Thackeray
Ravikant Tupkar : तुपकर म्हणाले, पक्षाचे झेंडे बाजूला ठेवा आणि शेतकरी म्हणून एकत्र या...

शेतकऱ्यांना केवळ सुका दिलासा देऊन होत नाही. एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट मदत करण्याची भूमिका आम्ही घेतली आहे. नुकसान भरपाईचे निकषण दोन हेक्टरवरून तीन हेक्टर केली आहे. निकषात बसत नसलेल्या शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणात मदत केली आहे. सरकार सर्वसामान्यांचे असून आम्ही टीकेला कामाने उत्तर देऊ. राज्यातील जनता सुज्ञ आहे, योग्यवेळी प्रत्येकाला जनता जागा दाखवत असते. जनतेला विश्वास आहे हे काम करणारे सरकार असून आम्ही काम करत राहू, त्यांना टीका करत राहू देत.

Eknath Shinde, Aditya Thackeray
Eknath Shinde Talk About CM Position : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले गुपित

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com