शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळात या आमदारांना लागणार मंत्रिपदाची लॉटरी?

शिंदे यांच्या सरकारमध्ये ४५ मंत्री असणार असून भाजपला ३० पेक्षा जास्त मंत्रिपदे, तर अपक्षांसह शिंदे गटाच्या वाट्याला सुमारे १४ ते १५ मंत्रीपदे येणार आहेत.
Eknath Shinde-Devendra Fadnavis
Eknath Shinde-Devendra FadnavisSarkarnama

सोलापूर : तब्बल दहा दिवसांचा राजकीय नाराजीनाट्य संपवून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्रीपदी आरूढ झाले आहेत. त्यांच्या मदतीसाठी पक्षश्रेष्ठींच्या इच्छेनुसार उपमुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) असणार आहेत. आता नव्या मंत्रीमंडळ निवडीचे काम शिंदे गट आणि भाजपकडून सुरू आहे. त्यानुसार शिंदे यांच्या सरकारमध्ये ४५ मंत्री असणार असून त्यात भाजपला अर्थातच मोठा वाटा राहणार आहे. त्यांना ३० पेक्षा जास्त मंत्रिपदे, तर अपक्षांसह शिंदे गटाच्या वाट्याला सुमारे १४ ते १५ मंत्रीपदे येणार आहेत. त्यात सामाजिक, राजकीय आणि प्रादेशिक समतोल साधण्याचे आव्हान शिंदे सरकारपुढे असणार आहे. (Eknath Shinde's government, 45 MLAs will be ministers)

एकनाथ शिंदे आणि पक्षातील तब्बल ३९ पेक्षा जास्त आमदारांनी बंड केल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री सोडावे लागले. ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज्यातील सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील, असा राजकीय धुरिणींचा होरा होता. मात्र भाजपश्रेष्टींनी धक्कातंत्राचा अवलंब करीत बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे यांच्या हाती नव्या सरकारचे स्टेअरिंग दिले आहे. दुसरीकडे, मोठी आकांक्षा बाळगून असणारे फडणवीस यांना शिंदे यांच्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी होण्यासही भाग पाडले.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
शिरूरमधील दोघांपैकी कोणाला लागणार मंत्रीपदाची लॉटरी?

नव्याने सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस यांना मंत्रीपदाचा प्रश्न सोडवावा लागणार आहे. कारण, मर्यादीत जागा आणि इच्छुकांची बाहुगर्दी यामुळे मंत्रीपद देताना या दोघांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार, नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वगळता साधारणपणे ४३ आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते. मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार, याचा तर्कवितर्क सध्या बांधले जात आहेत. पण, जातीय समिकरणे, बदललेली राजकीय स्थिती, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि २०२४ च्या निवडणुकीत सत्ताप्राप्ती, ही सर्व गणित डोळ्यासमोर ठेवूनच मंत्रीमंडळाची रचना केली जाऊ शकते.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
धनंजय मुंडेंनी मध्यरात्री घेतली फडणवीसांची भेट; दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास खलबतं!

यांना लागू शकते मंत्रिपदाची लॉटरी?

नव्या मंत्रिमंडळामध्ये विद्यमान मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, दादा भुसे, शंभूराज देसाई, बच्चू कडू, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासोबत नव्याने दीपक केसरकर, संजय शिरसाट, भरत गोगावले, तानाजी सावंत, संजय राठोड, शहाजी पाटील यांची शिंदे गटाकडून वर्णी लागेल, अशी सध्याची परिस्थिती आहे. भाजपमध्ये मात्र उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपद जाण्याची दाट शक्यता आहे. कारण मागील काळात त्यांनी हे पद स्वतःकडेच ठेवले होते. सत्ताप्राप्तीसाठी त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा, याचा राजकीय वस्तुपाठ त्यांनी घालून दिला होता. याशिवाय सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, विजयकुमार देशमुख किंवा सुभाष देशमुख, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, चंद्रशेखर बावनकुळे, गणेश नाईक, संभाजी पाटील-निलंगेकर, राणा जगजितसिंह पाटील, संजय कुटे, विजयकुमार गावित, सुरेश खाडे, जयकुमार रावल, अतुल सावे, देवयानी फरांदे, जयकुमार गोरे, विनय कोरे, राम शिंदे किंवा गोपीचंद पडळकर, नीतेश राणे, महेश लांडगे किंवा राहुल कुल असे मंत्री होतील, अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे. तसेच, अपक्षांसह छोट्या पक्षातील दोघे मंत्रिमंडळात असू शकतात.

शिंदे-फडणवीस जिंकून देणारे सहकारी निवडणार

ठाकरे सरकारमध्ये एकूण ३३ कॅबिनेट मंत्री आणि दहा राज्यमंत्री होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच मंत्रीमंडळाची व्यूहरचना करतील. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी दोन हात करून विजय मिळवून देणारे सहकारी ते निवडतील यात कोणतीही शंका नाही. कारण कारभारासाठी हाती दोन वर्षांचाच कालावधी असणार आहे, त्यातही निवडणुकांचा हंगाम पाहता मोठ्या जोमाने या जोडीला काम करावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com