शिवसेनेला टेन्शन देणारे एकनाथ शिंदे `रिलॅक्स मूड`मध्ये : हाॅटेलमधील `ऑंखो देखा हाल`

मंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) हे शिवसेनेच्या विरोधात बंडाच्या तयारीत असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेही टेंशन नाही.
Eknath Shinde News in Marathi, Shivsena News
Eknath Shinde News in Marathi, Shivsena NewsSarkarnama

सुरत : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) हे शिवसेनेच्या विरोधात बंडाच्या तयारीत असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेही टेन्शन नाही. ते रिलॅक्स मुडमध्ये सुरतमधील 'ली मेरेडियन' या हॉटेलमध्ये पुढचे निर्णय घेत आहेत, अशी माहिती त्या हॉटेलमध्ये उतरलेल्या `सरकारनामा`च्या वाचकाने दिली. ( Eknath Shinde giving tension to Shiv Sena in a relaxed mood )

हा वाचक आज सकाळीच त्या हॉटेलमध्ये पोहोचला. त्याने आधी बुकिंग केले होते. तरी त्याला पोलीस सोडत नव्हते. मात्र आधी बुकिंग केले असल्याचे हॉटेल व्यवस्थापनाने सांगितल्यानंतर त्याला प्रवेश मिळाला. आज सकाळी नाष्ट्याच्या वेळी एकनाथ शिंदे विटकरी रंगाच्या टी शर्टमध्ये लॉबीत फिरत असल्याचे या वाचकाला दिसले. शिंदे यांच्या हातात एक कागद होता. त्या कागदावरून ते सतत नजर फिरवित होते. इतर आमदारांचे आणि चेहरे मात्र या वाचकाला ओळखता आले नाहीत. हा वाचक एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनील मोठ्या पदावर आहे. (Eknath Shinde News in Marathi)

Eknath Shinde News in Marathi, Shivsena News
`घोडेबाजार` म्हणून आरोप करणाऱ्या संजय राऊत यांचा `यू टर्न!`.. निघाले विरारकडे!

या वाचकाच्या म्हणण्यानुसार सुरत विमानतळापासून हे हॉटेल फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावर आहे. या हॉटेलचे जुनेनाव द ग्रॅण्ड भगवती असे आहे. ली मेरेडियन ग्रुपने ते चालवायला घेतले आहे. हॉटेल परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. कोणालाही चौकशी केल्याशिवाय आत सोडले जात नाही किंवा बाहेर येऊ दिले जात नाही.

Eknath Shinde News in Marathi, Shivsena News
नॉटरिचेबल एकनाथ शिंदे गुजरातमध्ये

या नेत्यांतील संभाषण ऐकण्याची संधी या वाचकाला मिळाली. दिल्लीतून भाजपचा एक मोठा नेता येणार असल्याची चर्चा तिथे सुरू होती. तसेच गुजरात सरकारमधील दोन-तीन मंत्री देखील हॉटेलमध्येच असल्याचे चर्चेवरून कळाले. शिंदे यांच्या आजूबाजूला फार लोक नव्हते, असे या वाचकाने सांगितले. शिंदे यांच्या बाजूला असलेले लोकही टी शर्टमध्येच होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com