Eknath shinde : राज्यपालांचा आदेश डावलत, खोट्या कागदपत्रांद्वारे मुख्यमंत्र्याची फसवणूक?

Eknath Shinde : मुख्यमंत्री येऊ शकतात अडचणीत!
Eknath shinde
Eknath shinde Sarkarnama

Eknath shinde : राज्य शासनाच्या जलसंधारण महामंडळाकडील ६१९१ कोटी रूपयांच्या मंजूर कामे रद्द करण्यात आली होती. ती सर्व कामे स्थगित दाखवून खोटी कागदपत्रे तयार करून राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आणि प्रधान सचिव एकनाथ डवले मृद व महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सु. पां. कुशिरे यांनी संगनमताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फसवणूक करून खोटी कागदपत्रे तयार केली आहेत.

राज्यपालांच्या आदेशाचा भंग करून करण्यात आलेल्या कागदपत्राने मुख्यमंत्री अडचणीत येवू शकतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वत:पडताळणी करून, यात लक्ष घालून संबंधीत अधिका-यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा व योग्य प्रकारे याबाबत निर्णय घ्यावा व योग्य निर्णय न झाल्यास जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दिली.

Eknath shinde
Abhijit Katke : पुण्याच्या अभिजीत कटकेने पटकावला हिंदकेसरी किताब

दि. ८ जुलै २०२२ रोजी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडील प्रत्यक्ष सुरवात न झालेल्या कामांच्या सर्व स्तरावरील निविदा रद्द करणेबाबत महाराष्ट्र राज्यपाल यांचे आदेशानुसार अवर सचिव महाराष्ट्र शासन यांनी शासन निर्णय क्र. मजम-२०२२/प्र.क्र. १४३/जल-३ मंत्रालय मुंबई असा शासन निर्णय झाला होता. त्यानंतर सु. पां. कुशिरे व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ आणि प्रधान सचिव एकनाथ डवले मृद व जलसंधारण विभाग व राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी मुख्य सचिव कार्यालयाकडून दि. १०/११/२०२२ रोजी टिपणी काढून मागील शासनाच्या काळात मंजूर केलेल्या अनेक कामांना राज्य शासनाकडून स्थगिती देण्यात आली आहे. अशी स्थगिती देण्याचा राज्यशासनाचा निर्णय मा.उच्च न्यायालयात आव्हानात करण्यात आला असून, उच्च न्यायालयामध्ये यासंदर्भातील याचिकांची सुनावणी पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

Eknath shinde
Russia Ukraine War : युद्ध संपता संपेना; युक्रेनकडे वेळेची कमतरता तर रशियाची प्रतिष्ठा पणाला!

या पार्श्वभूमिवर स्थगिती आदेश कायम ठेवावेत किंवा उठवावेत याबाबत कृपया आदेश व्हावेत असा मसुदा तयार करून त्यावर मुख्य सचिव यांनी सही केली आहे आणि त्याखाली मुख्यमंत्री यांनी सोबत जोडलेल्या विवरण पत्रातील कामावरील स्थगिती उठवण्यात येत आहे, असे लिहून स्वत:ची सही केली आहे. वास्तविक या कामांना स्थगिती नव्हती ती राज्यपालांच्या वटहुकुमाने रद्द झाली होती. त्याखाली प्रधान सचिव मृद व जलसंधारण यांनी स्वत:ची सही करून पुढील कार्यवाहीस्तव सादर केले आहे, असे मुख्य सचिवांनी म्हंटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com