Bhilar : पुस्तकांच्या गावात रमले शिक्षणमंत्री... विद्यार्थ्यांशी साधला संवाद

पुस्तकाचे गाव Bhilar हा प्रकल्प अधिकाधिक लोकाभिमुख व्हावा. तो विद्यार्थी, वाचक आणि युवकांपर्यंत पोहोचण्याकरिता ब्रँडिंग करावे, असे आवाहन मंत्री केसरकर Deepak Kesarkar यांनी केले.
Deepak Kesarkar
Deepak Kesarkarsarkarnama

भिलार : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज पुस्तकांच्या गावाला सदिच्छा भेट दिली याप्रसंगी त्यांनी चक्क शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुलांनो पुस्तकांचं ओझ कमी करायचं का, तुम्हाला आता कॉम्पुटर किंवा स्क्रीनवर अभ्यास करायला आवडेल का, असे अनेक प्रश्न विचारून त्यांनी विद्यार्थ्यांच्या भावना जाणून घेतल्या.

पुस्तकांच्या गावाच्या प्रकल्प कार्याला दिलेल्या भेटीप्रसंगी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी पुस्तकाचे गाव हा प्रकल्प अधिकाधिक लोकाभिमुख व्हावा. तो विद्यार्थी, वाचक आणि युवकांपर्यंत पोहोचण्याकरिता ब्रँडिंग करावे, असे आवाहन त्यांनी केले. पुस्तकांचं गाव भिलार' या मराठी भाषा विभागाच्या प्रकल्पाची पाहणी मराठी भाषा व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली. या प्रकल्पाला आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी गरजेचे सर्व प्रयत्न करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

Deepak Kesarkar
केसरकर सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार तर गायकवाड म्हणतात,ही तर आमचीच इच्छा

यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी महादेव घुले, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव, भिलारचे सरपंच शिवाजी भिलारे, उपसरपंच सुनीता भिलारे, गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, प्रवीण भिलारे, राजेंद्र भिलारे, नितीन भिलारे, महाबळेश्वर युवासेना, तालुकाप्रमुख नितीन भिलारे, अनिल भिलारे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भिलारे, शशिकांत भिलारे, शांताराम भिलारे ,किसन भिलारे , जतीन भिलारे, तेजस्विनी भिलारे, बाबाजी उंबरकर, अशोक भिलारे, तलाठी शशिकांत वणवे, ग्रामसेवक राजेंद्र चव्हाण उपस्थित होते.

Deepak Kesarkar
पुस्तकाचं गाव 'भिलार'च्या दर्जाबाबच मुख्यमंत्री शिंदेंनी दिला महत्वाचा आदेश

शालेय शिक्षण मंत्री या नात्याने केसरकरांनी जिल्हा परिषद केंद्र शाळा भिलार येथे भेट देऊन येथील विद्यार्थ्यांशी मोकळेपणाने संवाद साधला. यावेळी प्रकल्प कार्यालयाच्या वतीने राजेश जाधव, बालाजी हळदे, उमा शिंदे यांनी कार्यालयामार्फत घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.पुस्तकांच्या गावासह महाबळेश्वर तालुक्यातील इतरही गावांचे प्रश्न यावेळी नितीन (भाई) भिलारे यांनी मांडले. यावर उचित कार्यवाही करू, असे मंत्री केसरकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in