मायणीमधील वैद्यकीय महाविद्यालयावर 'ईडी'ची वक्रदृष्टी : 65 कोटींचा घोटाळा

एका वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यक्षांसह त्यांच्या सहकाऱ्यांनी 65 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे प्रकरण अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) बाहेर काढले आहे.
Mayani Medical College
Mayani Medical CollegeSarkarnama

सातारा - राज्यातील वैद्यकीय प्रवेशासाठी मोठी रक्कम घेतली जात असल्याचे आरोप होत असतात. मात्र सातारा जिल्ह्यातील मायणी येथील एका वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यक्षांसह त्यांच्या सहकाऱ्यांनी 65 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे प्रकरण अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) बाहेर काढले आहे. त्यामुळे राज्यभर या घोटाळ्याची चर्चा सुरू झाली आहे. ( ED's crooked view on president of medical college in Mayni )

सातारा जिल्ह्यातील मायणी वैद्यकीय महाविद्यालयाचे अध्यक्ष महादेव देशमुख यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने एमबीबीएस घोटाळा केल्याचा आरोप ईडीकडून होत आहे. सुमारे 350 विद्यार्थ्यांची फसवणूक करून 65 कोटी रुपये जमा केल्याचा आरोप ईडीच्या आरोपपत्रात करण्यात आला आहे.

Mayani Medical College
'ईडी'चा धाक दाखवूनच राज्य सरकार बदलले

श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या इन्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स अॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येत होते. या प्रवेशासाठी मेडिकल कॉन्सिल ऑफ इंडिया व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची सुद्धा परवानगी घेण्यात आली नव्हती. विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांकडून पैसे घेतले मात्र प्रवेश दिला नाही. काहींचे पैसेच परत केले गेले नाहीत, असा आरोप आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in