मायणीच्या देशमुखांवर ईडीची कारवाई; १८ तारखेपर्यंत कोठडी

देशमुख आणि इतर १० जणांनी मोठ्या प्रमाणावर मनी लॉंड्रिंग करुन कोट्यवधींची अफरातफर केली आहे.
M.R.Deshmukh on ED Action
M.R.Deshmukh on ED ActionSarkarnama

सातारा : मायणी येथील मेडिकल कॉलेजचे तत्कालीन अध्यक्ष एम. आर. देशमुख (M.R. Deshmukh) यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) अटक केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या मायणी येथील संस्थेत तत्कालीन संचालक मंडळाने मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार झाल्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे. (M.R.Deshmukh on ED Action News)

M.R.Deshmukh on ED Action
बच्चू कडू गुन्हा; तपास अधिकाऱ्याला न्यायालयाने बोलवून घेतले

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान संचालक अरुण गोरे यांनी सक्तवसुली संचालनालयाकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीची इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ॲंड रिसर्च, रुरल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद रिसर्च ॲंड हॉस्पिटल या संस्था मायणी येथे सुरु आहेत. २०११ ते २०१६ या कालावधीत कार्यरत असणाऱ्या छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष एम. आर. देशमुख आणि इतर १० जणांनी मोठ्या प्रमाणावर मनी लॉंड्रिंग करुन कोट्यवधींची अफरातफर केली आहे.

संस्थेने हेल्थ केअर इन्फ्रा फायनान्स सुविधे अंतर्गत एचडीएफसी बॅंकेकडे कर्जाची मागणी केली होती. १५ कोटी २७ लाखांचे कर्ज बॅंकेकडून मंजूर करण्यात आले होते. या रकमेतून मेडिकल सायन्स आणि रिसर्च सेंटरसाठी वैद्यकीय उपकरणे खरेदी करायची असल्याचे बॅंकेला सांगण्यात आले होते. पुरवठादारांच्या उपकरणे खरेदी केल्याच्या बनावट पावत्या तत्कालीन अध्यक्ष आणि संचालक मंडळाने तयार करुन बॅंकेकडे जमा केल्या. सध्या कार्यरत असणाऱ्या संचालक मंडळाला या अफरातफरीची माहिती मिळाल्यानंतर संबंधित पुरवठादारांकडे चौकशी केली असता छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीला वैद्यकीय उपकरणे विकली नसल्याचे तसेच कोणतीही बिले सांगण्यात आले. बॅंकेनेही कर्जाची रक्कम संस्थेच्या खात्यावर वर्ग करुन चूक केली. सदर रक्कम तत्कालीन संचालक मंडळाने काढून घेतली. या अफरातफरीबाबत नवीन संचालक मंडळाला माहिती मिळाली. संस्थेत कोणतीही वैद्यकीय उपकरणे सापडली नाहीत.

M.R.Deshmukh on ED Action
अजितदादांसमोर फुशारकी मारली.. पण उदय सामंतांसाठी अडचणीची ठरली!

क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना बेकायदेशीरपणे प्रवेश देताना २५ लाखांप्रमाणे तत्कालीन संचालक मंडळाने पैसे घेतले होते. अशा प्रकारे सुमारे ३४ कोटींचा अपहार करण्यात आला होता. त्यावेळी मेडिकल कॉलेजची परवानगी रद्द करण्यात येवून दंडही करण्यात होता. वडूज पोलीस ठाण्यात याबाबत फसवणूकीची तक्रारही दाखल करण्यात आली आहे. अरुण गोरे यांनी ईडीकडे केलेल्या तक्रारीत आणखी काही घोटाळे नमूद करण्यात आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com