दुर्गा तांबे म्हणाल्या, आम्हाला निवडणुकांत रणधुमाळी करावी लागत नाही...

निवडणुकांसंदर्भात संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.
Durga Tambe

Durga Tambe

Sarkarnama

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील आगामी सहा महिने हे रणधुमाळीचे आहेत. नगर पंचायत, नगर पालिका, विधान परिषदा, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, साखर कारखाने, दूध संघ, ग्रामपंचायती आदींच्या निवडणुकाचा समावेश आहे. या निवडणुकांसंदर्भात काँग्रेसच्या ( Congress ) नेत्या तथा संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. Durga Tambe said, we don't have to fight in elections ...

अहमदनगर येथील 'सकाळ' कार्यालयाला नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी भेट देऊन संपादकीय टीमशी संवाद साधला. आगामी सहा महिन्यांत संगमनेर नगरपालिका व विधान परिषद पद्वीधर मतदार संघाची निवडणूक आहे. संगमनेर नगरपालिकेवर दुर्गा तांबे यांचे वर्चस्व आहे तर डॉ. सुधीर तांबे हे विधान परिषदेच्या पद्वीधर मतदार संघाचे आमदार आहेत. त्यामुळे 2022 हे वर्ष तांबे कुटुंबासाठी रणधुमाळीचे वर्ष आहे का? असा प्रश्न विचारला असता दुर्गा तांबे यांनी चफखल उत्तर दिले.

<div class="paragraphs"><p>Durga Tambe</p></div>
दुर्गा तांबे म्हणाल्या, बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून संगमनेरमध्ये चांगले काम होतय...

दुर्गा तांबे म्हणाल्या, आम्हाला निवडणुकीसाठी रणधुमाळी करावी लागत नाही. कारण आम्ही एक निवडणूक झाली की, लगेच पुढच्या दृष्टीने कामकाज करत राहतो. रोजचा अभ्यास करतो. हुशार विद्यार्थी जसा रोजचा अभ्यास रोज करतो तशी आमची काम करण्याची पद्धत आहे.

<div class="paragraphs"><p>Durga Tambe</p></div>
खोटं बोलायचं, हेच भाजपचे धोरण : डाॅ. सुधीर तांबे

त्या पुढे म्हणाल्या की, माझे पती डॉ. सुधीर तांबे यांची निवडणूक दर सहा वर्षांनी असते, पण त्यांचे रोजच्या रोज प्रश्न सोडविणं. दर आठवड्याला शिक्षकांचे प्रश्न घेऊन मुंबईला जाणं. नागरिकांच्या भेटी घेणं. शाळेला भेटी देणं. हे त्यांचं रोजचं असतं. त्यामुळे निवडणुका आल्या तरी आम्हाला चिंता वाटत नाही. त्यासाठी वेगळी तयारी करावी लागत नाही. त्यामुळे निवडणुकांचा ताण तणाव जाणवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com