अजित पवारांच्या या निर्णयामुळे नायगांवात आनंदोत्सव...

शासनाने या प्रशिक्षण केंद्रास मंजुरी दिल्याबाद्दल महाज्योतीचे Mahajyoti संचालक प्रा. दिवाकर गमे Divakar Game यांनी मंत्री अजित पवार Ajit Pawar व मंत्री छगन भुजबळ Chagan Bhujbal यांचे आभार मानले आहेत.
Naigaon Peoples, Ajit Pawar
Naigaon Peoples, Ajit PawarSYSTEM

खंडाळा : महाज्योतीचे देशातील पहिले मुलींचे नॅशनल डिफेन्स अकादमीचे स्पर्धा पूर्व प्रशिक्षण केंद्र ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जन्मगांव नायगांव (ता. खंडाळा) येथे होणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात 24 कोटी रुपयाची तरतूद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लक्ष घातले होते, अशी माहिती महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थाचे संचालक प्रा. दिवाकर गमे यांनी दिली आहे.

सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येलाच या प्रशिक्षण केंद्राबाबत शासनाने जाहीर करुन भावपूर्ण आंदराजंली दिली आहे. यावर्षीच्या सावित्रीबाई फुले जयंती दिवशी कार्यक्रमात मंत्री भुजबळ यांनी मुलींसाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे देशातील पहिले निवासी स्पर्धा पूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करणार असल्याची घोषणा केली होती.

Naigaon Peoples, Ajit Pawar
शिवेंद्रराजेंच्या 'त्या' व्यवहाराची उदयनराजे चौकशी लावणार

यानुसार महाराष्ट्र शासनाच्या वतीने याबाबत आदेश दिल्याने येथे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थाच्या वतीने राज्यातील मुलीसाठी देशातील पहिले मोफत व निवासी प्रशिक्षण केंद्र लवकरच सुरू होत आहे. यासाठी लागणाऱ्या जागेबाबत यापूर्वीच पाहणी करण्यात आली होती. येथे सुरूवातीला १०० मुलींचे हे निवासी प्रशिक्षण केंद्र मोफत सुरू केले जाणार आहे. त्या सोबतच विविध स्पर्धा पूर्व प्रशिक्षण, किमान कौशल्यावर आधारीत प्रशिक्षण केंद्रे, अद्यावत ग्रंथालय, अभ्यासिका ही सुरु केल्या जाणार आहे.

Naigaon Peoples, Ajit Pawar
Video: आर्थिक निकषांवर आरक्षण देऊन टाका; उदयनराजे भोसले

शासनाने या प्रशिक्षण केंद्रास मंजुरी दिल्याबाद्दल महाज्योतीचे संचालक प्रा. दिवाकर गमे यांनी मंत्री अजित पवार व मंत्री छगन भुजबळ यांचे आभार मानले आहेत. तसेच नायगांव नागरीकांचे सुध्दा सहकार्याबाबत अभिनंदन केले आहे. नायगाव येथे पेढे वाटुन आनंद व्यक्त करण्यात आला. ग्रामस्थांच्या वतीने स्मारकातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. संपूर्ण देशासाठी महिलांसाठी शिक्षणाचे दारे उघडणारे नायगाव या पविञभुमीत देश संरक्षणासाठीही मुलींना घडविण्याचे कार्याची सुरूवातही याच पवित्रभूमीतुन देशातुन प्रथमच घडत आहे, अशी प्रतिक्रिया समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नेवसे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com