तानाजी सावंत गेलेल्या मार्गाचे शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून केले शुद्धीकरण

तानाजी सावंत यांच्या दौऱ्यामुळे शिवसैनिकांना नोटिशा; काही जणांवर स्थानबद्धतेची कारवाई
Natepute Shiv Sainik
Natepute Shiv SainikSarkarnama

नातेपुते (जि. सोलापूर) : माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे आज (ता. ५ सप्टेंबर) राज्याचे आरोग्य मंत्री (Health Minister) प्रा. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचा दौरा होता. सावंत यांच्या दौऱ्यात अडथळा नको म्हणून येथील सर्व शिवसैनिकांना (shivsena) पोलिसांनी नोटीस बजावल्या होत्या. तसेच, अमोल उराडे व रुपेश लाळगे या दोन शिवसैनिकांना स्थानबद्ध करण्यात आले होते. मात्र तानाजी सावंत यांच्यावर शिवसैनिकांमध्ये अजूनही रोष असल्याचे दिसून आले. कारण, तानाजी सावंत गेलेल्या मार्गाचे शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केले. (Due to the visit of Tanaji Sawant, action against the Shiv Sainiks)

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांना आमदार तानाजी सावंत यांनी खंबीरपणे साथ दिली होती. या बंडखोरांच्या विरोधात राज्यातील शिवसैनिकांमधून अजूनही असंतोष व्यक्त केला जात आहे. तो ठिकठिकाणी जाणवत आहे. त्याच पद्धतीने आज नातेपुते आलेल्या सावंत यांच्या दौऱ्याला स्थानिक शिवसैनिकांनी विरोध दर्शविला होता.

Natepute Shiv Sainik
शेतकऱ्यांचे ३ लाखांपर्यंतचे कर्ज माफ करणार; शेतीला मोफत वीज देणार : राहुल गांधींची घोषणा

दरम्यान, आरोग्य मंत्री सावंत यांच्या दौऱ्यात कोणतेही अडथळे नको म्हणून पोलिसांनी नातेपुते येथील सर्व शिवसैनिकांना नोटिसा बजावल्या हेात्या. त्यातील दोघांना तर पोलिसांनी स्थानबद्ध केले होते. तानाजी सावंत यांच्या खासगी कार्यक्रमात आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी यांचा गर्दी जमावण्यासाठी वापर करण्यात आला. मंत्री सावंत यांच्या दौऱ्यात ज्या बोर्डचे उदघाटन केले, तो बोर्डही रस्त्यावरील किलोमीटर दर्शक बोर्ड वापरण्यात आला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा वापर सावंतांच्या दौऱ्यात करण्यात आला आहे, असा आरोप करून नातेपुते शहरात शिवसेनेकडून सावंतांचा निषेध करण्यात आला. याशिवाय, तानाजी सावंत नातेपुते शहरातील ज्या रस्त्यावर गेले, त्या रस्त्याचे गोमूत्र शिंपून शिवसैनिकांनी शुद्धीकरण केले आहे.

Natepute Shiv Sainik
'सत्तांतर होऊनही त्यांच्या डोक्यातील हवा अजून गेली नाही; ऑपरेशन करावे लागेल'

या दौऱ्याला शिवसैनिकांतून कडाडून विरोध झाला. शिंदे गटाने आयोजित केलेल्या समारंभावर अनेकांनी बहिष्कार टाकून निषेध व्यक्त केला आहे. या प्रसंगी अमोल उराडे, रुपेश लाळगे, नगरसेवक नंदकुमार लांडगे, संदीप लांडगे, किसन भगवान विरकर,नवनाथ राऊत आदींसह मोठ्या प्रमातणात शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in