Koregaon APMC : महेश शिंदेंच्या भितीने काँग्रेस, शिवसेनेला बरोबर घेण्याची त्यांच्यावर वेळ...सुनील खत्री

Sunil Khatri श्री. खत्री यांनी म्हटले की, कॅबिनेट मंत्री, विधान परिषदेचे माजी सभापती अशी पदे भूषवलेल्या तब्बल चार आमदारांच्या विरोधात सामान्य कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आमदार महेश शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीची निवडणूक लढवली.
Mahesh Shinde, Sunil Khatri, Shashikant Shinde
Mahesh Shinde, Sunil Khatri, Shashikant Shindesarkarnama

-पांडुरंग बर्गे

Koregaon APMC News : राष्ट्रवादी काँग्रेसला आमदार महेश शिंदे Mahesh Shinde यांची भीती असल्याने त्यांनी काँग्रेस पक्ष व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांना बरोबर घेण्याचा निर्णय घेतला. ज्यांच्या विरोधात त्यांनी कायम राजकारण केले, त्यांनाच बरोबर घेण्याची वेळ त्यांच्यावर या निवडणुकीत आली. रामराजे नाईक- निंबाळकर, बाळासाहेब पाटील Balasaheb Patil व शशिकांत शिंदे Shashikant Shinde या तिन्ही नेत्यांना तब्बल चार मेळावे व सभा घ्याव्या लागल्या. त्यांनी केलेल्या आर्थिक तडजोडीमुळे कोरेगाव तालुका शेतकरी विकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागल्याची टीका आघाडीचे प्रवर्तक व जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री Sunil Khatri यांनी केली आहे.

श्री. खत्री यांनी म्हटले की, कॅबिनेट मंत्री, विधान परिषदेचे माजी सभापती अशी पदे भूषवलेल्या तब्बल चार आमदारांच्या विरोधात सामान्य कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन बाजार समितीची निवडणूक आमदार महेश शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी लढवली. सामान्य शेतकऱ्यांना बाजार समितीत न्याय मिळावा, लयाला गेलेल्या संस्थेला गतवैभव मिळावे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून निवडणूक लढवली.

मात्र, सत्ताधाऱ्यांनी केलेल्या आर्थिक तडजोडीमुळे पराभवाला सामोरे जावे लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून बाजार समितीवर त्यांची एक हाती सत्ता आहे. सर्वसामान्यांना बाजार समितीमध्ये प्रतिनिधित्व करता यावे, शेतकऱ्यांना न्याय देता यावा, यासाठी पुरेसे संख्याबळ व मतदार संख्या नसतानाही शेतकरी बांधवाचे हित जोपसण्यासाठी या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Mahesh Shinde, Sunil Khatri, Shashikant Shinde
Koregaon APMC News : कोरेगावात लोकांच्या उद्रेकाला सुरवात; विरोधकांचे गणित त्यांच्यावरच उलटले... शशिकांत शिंदे

बाजार समितीची सत्ता काबीज करणे हा त्यामागील उद्देश नव्हता तर सर्वसामान्य घरातील सामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला संचालक होण्याचा बहुमान मिळावा हा त्यामागील उद्देश होता. राष्ट्रवादी काँग्रेसला आमदार महेश शिंदे यांची भीती असल्याने त्यांनी काँग्रेस पक्ष व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांना बरोबर घेण्याचा निर्णय घेतला. ज्यांच्या विरोधात त्यांनी कायम राजकारण केले, त्यांनाच बरोबर घेण्याची वेळ त्यांच्यावर या निवडणुकीत आली.

Mahesh Shinde, Sunil Khatri, Shashikant Shinde
Nana Patole :राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष पुरोगामी विचारधारेला धरुन चालेल |Congress | NCP |Sarkarnama

रामराजे नाईक- निंबाळकर, बाळासाहेब पाटील व शशिकांत शिंदे या तिन्ही नेत्यांना तब्बल चार मेळावे व सभा घ्याव्या लागल्या. विरोधक ४०० मताधिक्याने विजयाच्या वल्गना करत होते, मात्र, त्यांचे मताधिक्य शंभरच्या आसपास आणून ठेवले आहे. तालुकास्तरावरील सहकारी संस्थेच्या निवडणुकीत उतरण्याचा हा आमदार महेश शिंदे यांचा पहिलाच प्रयत्न होता. या प्रयत्नाला अपेक्षित यश आले नसले तरी यश मात्र मिळविले आहे. भविष्यकाळात संपूर्ण कोरेगाव तालुक्यावर आमदार महेश शिंदे लक्ष केंद्रित करणार आहेत, असेही श्री. खत्री यांनी शेवटी पत्रकात नमूद केले आहे.

Mahesh Shinde, Sunil Khatri, Shashikant Shinde
Shashikant Shinde Vs Mahesh Shinde: त्यांना लाज वाटली पाहिजे; महेश शिंदेंनी शशिकांत शिंदेंची लाज काढली...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in